जाहिरात

Lokpal BMW Car Tender: 'साधेपणा'ची शपथ घेणाऱ्या लोकपालला BMW चा मोह; 70 लाखांच्या 7 कारसाठी टेंडर

Lokpal BMW Car Tender: देशात भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या 'लोकपाल' (Lokpal) या संस्थेकडून एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे.

Lokpal BMW Car Tender: 'साधेपणा'ची शपथ घेणाऱ्या लोकपालला BMW चा मोह; 70 लाखांच्या 7 कारसाठी टेंडर
Lokpal BMW Car Tender: तब्बल प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीच्या सात BMW सिरीज 3 Li कार खरेदी करण्याची निविदा (Tender) काढण्यात आली आहे.
मुंबई:

Lokpal BMW Car Tender: देशात भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या 'लोकपाल' (Lokpal) या संस्थेकडून एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. खुद्द भ्रष्टाचारविरोधी लोकपालला आता आलिशान कारची (Luxury Cars) भुरळ पडली आहे. लोकपालने अध्यक्ष आणि इतर सदस्यांसाठी तब्बल प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीच्या सात BMW सिरीज 3 Li कार खरेदी करण्याची निविदा (Tender) काढली आहे. एकूण 7 कारसाठी सुमारे 4.9 कोटी रुपये खर्च येणार असून, या निर्णयामुळे ऑनलाइन आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी लोकपाल आपल्याच ऐषारामात मग्न आहे,' अशा शब्दांत अनेकांनी टीका केली आहे.

काय आहे प्रकरण?

भारताचे भ्रष्टाचारविरोधी लोकपाल, ज्याचे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर (Ajay Manikrao Khanwilkar) कार्यरत आहेत, त्यांनी या सात आलिशान गाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लोकपालचे अध्यक्ष आणि इतर सहा सदस्यांसाठी (एकूण 7 जणांसाठी) या कार खरेदी केल्या जातील.

16 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, "भारताच्या लोकपालने प्रतिष्ठित एजन्सींकडून लोकपालसाठी सात BMW 3 सिरीज Li कार पुरवठ्यासाठी खुली निविदा आमंत्रित केली आहे." प्रत्येक कारची किंमत सुमारे 70 लाख रुपये इतकी आहे.

( नक्की वाचा : RSS Diwali Message: संघ स्वयंसेवक दिवाळी शुभेच्छा देताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख का करत आहेत? जाणून घ्या अर्थ )
 

7 दिवसांचे विशेष प्रशिक्षण

या आलिशान कार पुरवठा करणाऱ्या BMW कंपनीला लोकपालच्या चालकांना आणि कर्मचाऱ्यांसाठी सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण (Training) आयोजित करण्यास सांगितले जाईल. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, या प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना या अत्याधुनिक गाड्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणि कार्यप्रणाली (Electronic Systems and Operations) बद्दल माहिती दिली जाईल.

ऑनलाइन आणि राजकीय टीका

लोकपालच्या या निर्णयामुळे समाज माध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत भूषण Prashant Bhushan) यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. त्यांनी सरकारवर आरोप केला आहे की, "भ्रष्टाचाराची चिंता नसलेले आणि केवळ आपल्या ऐषारामात आनंदी असलेले चाटूगिरी करणारे सदस्य नेमून सरकारने लोकपाल संस्थेची माती केली आहे. आता हेच लोक स्वतःसाठी 70 लाख रुपये किमतीच्या BMW गाड्या खरेदी करत आहेत!"

काँग्रेसच्या युवक शाखेनेही लोकपालवर निशाणा साधला आहे. "जबाबदारीचे प्रतीक असलेली लोकपाल संस्था आज उद्ध्वस्त झाली आहे... महत्त्वाचे सदस्य नियुक्त नसताना सरकार एका संस्थेसाठी इतक्या महागड्या विदेशी गाड्या का खरेदी करत आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अनेक X (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यांनीही उपहासात्मक टीका केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, "ते (लोकपाल सदस्य) 70 लाख रुपये किमतीची कार खरेदी करत आहेत. ते तर 12 कोटी रुपये किमतीची रोल्स रॉयस (Rolls Royce) देखील खरेदी करू शकले असते... पण त्यांनी तसे केले नाही, कारण ते साधे आणि जमिनीवर पाय असलेले लोक आहेत. म्हणूनच त्यांनी BMW निवडली..." असं मत हे युझर्स विचारत आहेत. 

निविदेची वैधता

निविदा सूचनेनुसार, हे प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून 90 दिवसांपर्यंत वैध राहतील. भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेकडूनच इतका मोठा खर्च होत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com