यशवंतराव ते देवाभाऊ... महाराष्ट्राचे आजवर किती मुख्यमंत्री झाले? कुणाचा कालावधी होता सर्वात जास्त?

Maharashtra Chief Ministers list : यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1960 ते 2024 या कालाधवधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कोण-कोण झाले हे पाहूया.  

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड झाली. या निवडीनंतर फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे.  विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. त्यानंतर भावी मुख्यमंत्री भाजपाचाच असणार हे स्पष्ट झालं होतं. निवडणूक निकालानंतर नाव जाहीर होण्यास उशीर होत असल्यानं राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वानं यंदा कोणताही धक्का न देता देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केली.

देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मु्ख्यमंत्री होणार आहेत. त्यांनी 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रिपद भुषवलं. वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते.

फडणवीस यांच्या नावावर राज्याचा सर्वात कमी काळ मुख्यमंत्रिपद भुषविण्याचाही विक्रम आहे. 2019 साली विधासभा निवडणुकीनंतर फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण, त्यावेळी त्यांचं मुख्यमंत्रिपद फक्त 80 तास टिकलं होतं. यापूर्वीच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात फडणवीस उपमुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्रिपद भुषविल्यानंतर मुख्यमंत्री होणारे फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
 

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1960 ते 2024 या कालाधवधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कोण-कोण झाले हे पाहूया. 

Advertisement
क्रमांक मुख्यमंत्री वर्ष एकूण कालावधी
1 यशवंतराव चव्हाण 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 2 वर्ष 3 दिवस
 
2 मारोतवार कन्नमवार 20 नोव्हे. 1962 ते 24 नोव्हें. 1963 1 वर्ष 4 दिवस
3 पी. के. सावंत 25 नोव्हें. 1963  ते 5 डिसें. 1963  10 दिवस
4 वसंतराव नाईक 5 डिसें. 1963  ते 21 फेब्रु. 1975      11 वर्ष 78 दिवस
5 शंकरराव चव्हाण 21 फेब्रु. 1975 ते 17 मे 1977 2 वर्ष 85 दिवस
6 वसंतदादा पाटील 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 1 वर्ष 62 दिवस
7 शरद पवार 18 जुलै 1978 ते 17 फेब्रु. 1980 1 वर्ष 214 दिवस
राष्ट्रपती राजवट 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 112 दिवस
8 ए. आर. अंतुले 9 जून 1980 ते 21 जाने. 1982 1 वर्ष 226 दिवस
9 बाबासाहेब भोसले 21 जाने. 1982 ते २ फेब्रु. 1983 1 वर्ष 12 दिवस
10 वसंतदादा पाटील     2 फेब्रु. 1983 ते 3 जून 1985 2 वर्ष 121 दिवस
 
11 शिवाजीराव पाटील निलंगेकर 3 जून 1985 ते 12 मार्च 1986 282 दिवस
12 शंकरराव चव्हाण 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 2 वर्ष 106 दिवस
13 शरद पवार 26 जून 1988 ते 25 जून 1991 2 वर्ष 364 दिवस
14 सुधाकरराव नाईक 25 जून 1991 ते 6 मार्च 1993     1 वर्ष 254 दिवस
15 शरद पवार 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 2 वर्ष 8 दिवस
16 मनोहर जोशी  14 मार्च 1995 ते 1 फेब्रु. 1999 3 वर्ष 324 दिवस
17 नारायण राणे 1 फेब्रु. 1999 ते 18 ऑक्टो. 1999 259  दिवस
18 विलासराव देशमुख 18 ऑक्टो. 1999 ते 18 जाने. 2003 3 वर्षं 92 दिवस
 
19 सुशीलकुमार शिंदे 18 जाने. 2003 ते 1 नोव्हें. 2004  1 वर्षं 288 दिवस
20 अशोक चव्हाण 8 डिसें. 2008 ते 11 नोव्हें. 2010 1 वर्षं 338 दिवस
21 पृथ्वीराज चव्हाण 11 नोव्हें. 2010 ते 28 सप्टें. 2014 3 वर्षं 321 दिवस
राष्ट्रपती राजवट 28 सप्टें. 2014  ते 30 ऑक्टो. 2014  32 दिवस
22 देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टो. 2014 ते 2 नोव्हें. 2019 5 वर्षं 12 दिवस
23 राष्ट्रपती राजवट 12 नोव्हें. 2019 ते 23 नोव्हें. 2019 11 दिवस
24 देवेंद्र फडणवीस 23 नोव्हें. 2019 ते 28 नोव्हें. 2019 5 दिवस
25 उद्धव ठाकरे     28 नोव्हें. 2019 ते 30 जून 2022 2 वर्षं 214 दिवस
26 एकनाथ शिंदे     30 जून 2022 ते 26 नोव्हें. 2024 2 वर्षं 149 दिवस
27 देवेंद्र फडणवीस

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण?

राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. ते 5 डिसेंबर 1963  ते 21 फेब्रुवारी 1975 या कालावधीमध्ये सलग 11 वर्ष 78 दिवस मुख्यमंत्री होते. त्यानंतर शरद पवारांचा नंबर आहे. पवार एकूण तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी साधारण साडेसहा वर्ष मुख्यमंत्रिपद भुषवलं. देवेंद्र फडणवीस या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते यापूर्वीच्या दोन टर्म मिळून 5 वर्ष 17 दिवस मुख्यमंत्री होते.