जाहिरात

यशवंतराव ते देवाभाऊ... महाराष्ट्राचे आजवर किती मुख्यमंत्री झाले? कुणाचा कालावधी होता सर्वात जास्त?

Maharashtra Chief Ministers list : यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1960 ते 2024 या कालाधवधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कोण-कोण झाले हे पाहूया.  

यशवंतराव ते देवाभाऊ... महाराष्ट्राचे आजवर किती मुख्यमंत्री झाले? कुणाचा कालावधी होता सर्वात जास्त?
मुंबई:

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड झाली. या निवडीनंतर फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे.  विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. त्यानंतर भावी मुख्यमंत्री भाजपाचाच असणार हे स्पष्ट झालं होतं. निवडणूक निकालानंतर नाव जाहीर होण्यास उशीर होत असल्यानं राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वानं यंदा कोणताही धक्का न देता देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केली.

देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मु्ख्यमंत्री होणार आहेत. त्यांनी 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रिपद भुषवलं. वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते.

फडणवीस यांच्या नावावर राज्याचा सर्वात कमी काळ मुख्यमंत्रिपद भुषविण्याचाही विक्रम आहे. 2019 साली विधासभा निवडणुकीनंतर फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण, त्यावेळी त्यांचं मुख्यमंत्रिपद फक्त 80 तास टिकलं होतं. यापूर्वीच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात फडणवीस उपमुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्रिपद भुषविल्यानंतर मुख्यमंत्री होणारे फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
 

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1960 ते 2024 या कालाधवधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कोण-कोण झाले हे पाहूया. 

क्रमांकमुख्यमंत्रीवर्षएकूण कालावधी
1यशवंतराव चव्हाण1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 19622 वर्ष 3 दिवस
 
2मारोतवार कन्नमवार20 नोव्हे. 1962 ते 24 नोव्हें. 19631 वर्ष 4 दिवस
3पी. के. सावंत25 नोव्हें. 1963  ते 5 डिसें. 1963 10 दिवस
4वसंतराव नाईक5 डिसें. 1963  ते 21 फेब्रु. 1975     11 वर्ष 78 दिवस
5शंकरराव चव्हाण21 फेब्रु. 1975 ते 17 मे 19772 वर्ष 85 दिवस
6वसंतदादा पाटील5 मार्च 1978 ते 18 जुलै 19781 वर्ष 62 दिवस
7शरद पवार18 जुलै 1978 ते 17 फेब्रु. 19801 वर्ष 214 दिवस
राष्ट्रपती राजवट17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980112 दिवस
8ए. आर. अंतुले9 जून 1980 ते 21 जाने. 19821 वर्ष 226 दिवस
9बाबासाहेब भोसले21 जाने. 1982 ते २ फेब्रु. 19831 वर्ष 12 दिवस
10वसंतदादा पाटील    2 फेब्रु. 1983 ते 3 जून 19852 वर्ष 121 दिवस
 
11शिवाजीराव पाटील निलंगेकर3 जून 1985 ते 12 मार्च 1986282 दिवस
12शंकरराव चव्हाण12 मार्च 1986 ते 26 जून 19882 वर्ष 106 दिवस
13शरद पवार26 जून 1988 ते 25 जून 19912 वर्ष 364 दिवस
14सुधाकरराव नाईक25 जून 1991 ते 6 मार्च 1993    1 वर्ष 254 दिवस
15शरद पवार6 मार्च 1993 ते 14 मार्च 19952 वर्ष 8 दिवस
16मनोहर जोशी 14 मार्च 1995 ते 1 फेब्रु. 19993 वर्ष 324 दिवस
17नारायण राणे1 फेब्रु. 1999 ते 18 ऑक्टो. 1999259  दिवस
18विलासराव देशमुख18 ऑक्टो. 1999 ते 18 जाने. 20033 वर्षं 92 दिवस
 
19सुशीलकुमार शिंदे18 जाने. 2003 ते 1 नोव्हें. 2004 1 वर्षं 288 दिवस
20अशोक चव्हाण8 डिसें. 2008 ते 11 नोव्हें. 20101 वर्षं 338 दिवस
21पृथ्वीराज चव्हाण11 नोव्हें. 2010 ते 28 सप्टें. 20143 वर्षं 321 दिवस
राष्ट्रपती राजवट28 सप्टें. 2014  ते 30 ऑक्टो. 2014 32 दिवस
22देवेंद्र फडणवीस31 ऑक्टो. 2014 ते 2 नोव्हें. 20195 वर्षं 12 दिवस
23राष्ट्रपती राजवट12 नोव्हें. 2019 ते 23 नोव्हें. 201911 दिवस
24देवेंद्र फडणवीस23 नोव्हें. 2019 ते 28 नोव्हें. 20195 दिवस
25उद्धव ठाकरे    28 नोव्हें. 2019 ते 30 जून 20222 वर्षं 214 दिवस
26एकनाथ शिंदे    30 जून 2022 ते 26 नोव्हें. 20242 वर्षं 149 दिवस
27देवेंद्र फडणवीस

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण?

राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. ते 5 डिसेंबर 1963  ते 21 फेब्रुवारी 1975 या कालावधीमध्ये सलग 11 वर्ष 78 दिवस मुख्यमंत्री होते. त्यानंतर शरद पवारांचा नंबर आहे. पवार एकूण तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी साधारण साडेसहा वर्ष मुख्यमंत्रिपद भुषवलं. देवेंद्र फडणवीस या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते यापूर्वीच्या दोन टर्म मिळून 5 वर्ष 17 दिवस मुख्यमंत्री होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com