Mumbai BMC Election 2025 News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना (उबाठ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना अॅनाकोंडाशी केलीय.
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार | Maharashtra DCM Eknath Shinde Hits Back Uddhav Thackeray
"गेली 25 वर्षे या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळखा घालून बसलेले आहेत आणि या अॅनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळे आहे, याचं पोट भरत नाही. म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचे पोट भरत नाही",अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय.
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुंबई गिळंकृत करू इच्छिणारा अॅनाकोंडा असे म्हटलं होतं, यावरूनच शिंदेंनी पलटवार केलाय.
(नक्की वाचा: Viral video: अजित पवारांच्या पक्ष कार्यालयात 'वाजले की बारा'चे सुर, ठेका धरत लावणीचे सादरीकरण)
वरळीच्या एनएससीआय डोम येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा आयोजित केला होता. यावेळेस उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर निशाणार साधत म्हटले की, "केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत येऊन गेले. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई पालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही".
उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर काय टीका केली होती, ऐका... Uddhav Thackeray | Amit Shah | BMC Election 2025
(नक्की वाचा: BMC Election: भाजप-शिंदे गटात 50 जागांवरून रस्सीखेच, बूथ लेव्हलपर्यंत मोर्चेबांधणी सुरू)