- महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून NCRB च्या अहवालानुसार राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर
- 2025 मध्ये राज्यात बलात्काराच्या आठ हजाराहून अधिक घटनांची नोंद झाली असून 2024 च्या तुलनेत वाढ दिसून येते
- अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे
महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. राज्यात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचाराची घटना रोज होताना आपण पाहात आहेत. काही घटना तर सर्वांना हादरवून टाकणाऱ्या आहेत. सरकार उपाय योजना करते पण त्या कागदावरच राहातात की काय असं म्हणण्याची वेळ आली आहे. अलीकडच्या काळात तर महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नुकताच NCRB चा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा प्रश्न आज विधान सभेत उपस्थित करण्यात आला होता.
महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे 47 हजार 954 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच महिला अत्याचारात देशात दुसरा क्रमांक असल्याचा अहवाल ही समोर आला आहे. 2025 मध्ये राज्यात बलात्काराच्या 8,643 घटना घडल्या होत्या. तर तर 2024 मध्ये 7 हजार 940 घटनांची नोंद झाली होती. ताज्या अहवालानुसार 2025 मध्ये बालकांवरील अत्याचाराच्या घटनांत 482 ने वाढ झाली आहे. ही राज्यासाठी निश्चितच चिंतेची बाब म्हटली पाहीजे.
NCRB च्या 2024 अहवालानुसार महिला अत्याचाराचे 47,954 गुन्हे नोंद झाले आहे.महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं हा अहवाल सांगतो. कोल्हापूर परिक्षेत्रात 2024-25 या दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या 2,362 आणि विनयभंगाच्या 4,485 घटना घडल्या आहेत. राज्यात याच भागात महिलांवर जास्त अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. तर अहिल्यानगरमध्ये 2022-25 दरम्यान अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या 641 घटना घडल्या आहेत. तर 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांत 41 प्रकरणे समोर आली आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना बदलापूर व नसरापूर अत्याचार प्रकरणांत गुन्हे दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. राज्यात महिला सुरक्षेसाठी 51 भरोसा सेल, 58 फास्ट ट्रॅक न्यायालये, दामिनी पथके, हेल्पलाईन व विशेष तपास पथके कार्यरत असल्याचं ही त्यांनी सांगितलं. शक्ती कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा नव्या फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.