संजय तिवारी, प्रतिनिधी
IAS V Radha Transfer : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलाय, असा आरोपही त्यांनी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय केला आरोप?
'नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या 1400 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला श राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम' योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे 250 कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असं त्यांचं मत होते. शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हप्ता वळवण्यासही राधा यांचा विरोध होता.
या योजनेतील 1400 कोटी वळविण्याला राधा यांनी विरोध केल्यानंतरही तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टाहास होताच. राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता. 'या अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता' असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने श्रीमती राधा यांची बदली केली आहे,' असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
( नक्की वाचा : राज ठाकरेंचा पुन्हा 'बिनशर्त पाठिंबा'? महायुतीच्या बैठकीत तीनही पक्षांच्या नेत्यांची खलबते )
कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. हे दुर्दैव असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा असल्याची टीकाही त्यांनी केली.
कोण आहेत राधा?
व्ही राधा या 1994 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. केंद्र सरकारमधील प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या 24 जून रोजी राज्यातील सनदी सेवेत परतल्या होत्या. त्यांची कृषी मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी मतभेद झाल्यानंतरच त्यांची बदली सामान्य प्रशासन विभागात करण्यात आल्याची चर्चा आहे. वडेट्टीवार यांनी देखील हाच आरोप केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world