जाहिरात

MLA oath-taking ceremony : महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, बैठकीत निर्णय

MLA oath-taking ceremony :  महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, बैठकीत निर्णय

विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधीमंडळात पार पडत आहे. महायुतीचे सर्व आमदार आज विधानसभेत उपस्थित आहेत. विरोधी पक्षातील आमदार देखील विधानसभेत उपस्थित होते. मात्र विरोधी पक्षातील कोणत्याचा आमदाराने शपथ घेतली नाही.

महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षातील आमदार सभागृहातून बाहेर पडले होते. सुरुवातीला कुठल्याच विरोध पक्षातील आमदाराने शपथ न घेत शपथविधी सोहळ्यावर एकप्रकारे बहिष्कारच घातला आहे. 

(नक्की वाचा-  MLA Swearing in Ceremony LIVE updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, सभागृहात 'जय श्री राम'च्या घोषणा)

आमदारांचा शपथविधी सुरु झाल्यानंतर आदित्य ठाकरेंसह विरोधी पक्षाचे आमदार सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. 

(नक्की वाचा- एकनाथ शिंदेंचं मन फडणवीसांनी कस वळवलं? पडद्यामागे काय घडलं? NDTV मराठी Exclusive)

विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शपथविधीबाबत बैठक घेतली. विरोधी पक्षातील प्रमुख नेते बैठक घेऊन आमदारांनी शपथ घ्यायची की नाही याबाबत चर्चा केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार आज शपथ घेणार नाही ही भूमिका स्पष्ट केली.

पाहा व्हिडीओ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Mahavikas Aghadi, MLA Oath Ceremony, विधानसभा विशेष अधिवेशन