जाहिरात

Malegaon Bomb Blast Case : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी

2008 Malegaon Bomb Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालानंतर काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Malegaon Bomb Blast Case : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी
Malegaon Bomb Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई:

2008 Malegaon Bomb Blast Case Verdict: मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  मुंबई विशेष न्यायालयाने आज (31 जुलै) हा निकाल दिला.  या प्रकरणात 'भगवा दहशतवाद' हा शब्द तयार करुन हिंदू दहशतवाद्याचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न तत्कालीन युपीए सरकारनं केला होता. या प्रकरणात तो खोटा असल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या निकालानंतर काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

'काँग्रेसप्रणित यूपीए सरकारनं हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकींमध्ये अल्पसंख्याकांच लांगुलचालन करण्याचा प्रयत्न केला होता.  हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता, तो आज किती खोटा होता हे उघड झालं आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री फडणवीस पुढं म्हणाले की,  'ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा काँग्रेसे आणि यूपीएनं प्रयत्न केला, तो किती खोटा होता हे कोर्टाने आज पुराव्यानिशी सांगितलं आहे. खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहीजे, पण सर्वात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे.

( नक्की वाचा : Malegaon Bomb Blast: 'माझ्याच देशाने मला दहशतवादी बनवलं', निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञाला अश्रू अनावर )

ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला, त्याबद्दल काँग्रेसनं जाहीर माफी मागितली पाहिजे,'

बॉम्बस्फोट कुणी केला?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर हा बॉम्बस्फोट कुणी केला हे आता पोलीस सांगतील. त्यावेळेसच्या यंत्रणेनं काय तपास केला हे त्यांना विचारावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणााले. 'आपल्याला कल्पना आहे की त्यावेळीही ठाकरेसाहेब आता ज्यांच्यासोबत बसले आहेत, त्यांचं सरकार होतं. त्यांच्याच पोलिसांनी हे केलं आहे. माझी अपेक्षा होती की त्यांनी भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला हवं होतं. पण, कदाचित ते ही आता लांगुलचालन करणाऱ्यांच्या सोबत गेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारत आहेत,' अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  

(नक्की वाचा : Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण! सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता )

आम्ही या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करु आणि त्यानंतरच याबाबत पुढील निर्णय घेऊ. पण, सध्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार हे षडयंत्र आहे असं दिसत आहे, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना स्पष्ट केलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com