मविआ किती जागा जिंकणार? खरगे- ठाकरेंचे आकडे वेगवेगळे, पवारांचा अंदाज काय?

एक मंच, तिन नेते पण अंदाज वेगवेगळे असा अनुभव या पत्रकार परिषदेत आला. त्यामुळे 4 जूनलाच कोणाली किती जागा मिळतील हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत झाली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेच महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळणार याबाबत या तिनही नेत्यांनी तिन वेगवेगळे आकडे सांगितले. पण आकडे जरी वेगवेगळे असले तरी महाराष्ट्र कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे या तिनही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेस अध्यक्षांनी केला मोठा दावा 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असल्याचे सांगितले. सध्या मोदीं आणि भाजप विरोधात लाट असल्याचा दावाही खरगे यांनी केला. महाराष्ट्रातले यावेळचे वातावरण पाहात महाविकास आघाडीला 46 जागा जिंकतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. भाजपला जागा मिळणारच नाही तर एक दोन जागा त्यांच्या पारड्यात पडतील असेही ते म्हणाले. शिवाय केंद्रात इंडिया आघाडीचे सरकारही बनेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - साधूंचं हत्याकांड झालं त्या गावाकडे राजकारण्यांची पाठ का?

उद्धव ठाकरेंनी सांगितला आणखी एक आकडा 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मविआला 46 जागा मिळतील असे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपलाही मविआला किती जागा मिळणार हे सांगून टाकले. सध्याची स्थिती पाहात 46 नाही तर 48 जागा आम्ही जिंकू असे उद्धव ठाकरे यांनी ठाम पणे सांगितले. आपल्याकडे तसे रिपोर्ट आले आहेत असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकी दरम्यान  सभांचा सपाटा लावला होता. शिवाय पक्षफुटीनंतर ठाकरेंना सहानुभूती असल्याचेही बोलले जात आहे. 

हेही वाचा - पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं

शरद पवारांचा अंदाज काय? 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मविआत 30 ते 35 जागा महाराष्ट्रात जिंकेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर खरगे आणि ठाकरे यांनी आपला अंदाज पवारांसमोरच सांगितला. त्याबाबत बोलताना पवार यांनी आपल्याकडे जी माहिती आहे त्या पेक्षा अधिक माहिती आणि रिपोर्ट खरगे साहेबांकडे आहेत. मात्र त्यांनी सांगितलेल्या आकड्याच्या आसपास जागा मविआला निश्चित मिळती असेही पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे एक मंच, तिन नेते पण अंदाज वेगवेगळे असा अनुभव या पत्रकार परिषदेत आला. त्यामुळे 4 जूनलाच कोणाली किती जागा मिळतील हे स्पष्ट होणार आहे.   

Advertisement