Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेरलं, आझाद मैदानात नक्की काय घडलं?

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या आझाद मैदानात गेल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातल्या मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. शिवाय ते मोठ्या संख्येने आझाद मैदानात उपस्थित आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमीका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या आंदोलनाला अनेक पक्षांनी आणि नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे या ही आझाद मैदानात गेल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांना मराठा आंदोलकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. त्यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला. 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या आझाद मैदानात गेल्या होत्या. मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्या निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी अक्षरश: घेरलं होतं. मराठा आंदोलक त्यांना आरक्षणाबाबत जाब विचार होते. काही जण तर शरद पवारांनी काय केलं असा प्रश्नही त्यांना करत होते. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांना त्यावेळी सुरक्षारक्षक रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते पण त्यांचा संताप टोकाला गेला होता. असा स्थितीत सुरक्षारक्षकांनी सुप्रिया सुळे यांना त्या गर्दीतून सुखरूप बाहेर काढले. 

नक्की वाचा - मोठा पेच! मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी' संबोधण्यास हायकोर्ट- सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार

त्यानंतर त्या पुढच्या मार्गी गेल्या. मात्र त्यानंतर उपस्थित मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे.  तसेच "उद्यापासून पाणी पण बंद करणार आहे. कडक उपोषण करणार आहे.  यांना कितीही अन्याय अत्याचार करू द्या आपण शांत राहायचं. काहीही करून तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढण्याचे आदेश दिले तर ही का काढत नाहीत?" असा सवालही मनोज जरांग पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषण ही करत आहेत. लाखो मराठा समाजाचे लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पण असं असलं तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आणि सरसकट कुणबी संबोधण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. उच्च न्यायालया बरोबरच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. दोन्ही कोर्टाचे निकाल या मार्गातील सर्वांत मोठे अडसर झाला आहे. यात काही प्रकरणाच्या सुनावणीत कोर्टाने मराठा समाजाला सरसकट कुणी संबोधण्यास नकार दिला आहे.  

Advertisement