जाहिरात

Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा आंदोलकाला तातडीने मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू

Manoj Jarange Patil Maratha Morcha : आज मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दक्षिण मुंबईतील वातावरण मराठामय झाले आहेत. सुविधांअभावी त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी ते ठाम असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव  मुंबईत तळ ठोकून आहेत. 

मराठा आंदोलनादरम्यान (Maratha reservation) मात्र एक हळहळणारं वृत्त समोर आलं आहे. मराठा आंदोलनादरम्यान आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अद्यापही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. शनिवारी मुंबईत येत असताना विजय घोगरे या आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. घोगरे हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगावचे रहिवासी होते.  आंदोलनाच्या पहिल्या दिवशीही एका तरुणाचा हृदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारीही लातूरच्या विजय घोगरे यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यानंतर त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. 

Manoj Jarange : जरांगे पाटलांकडून नवं 'चॅलेंज'; सातारा-हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासकांना आझाद मैदानावर बोलावले

नक्की वाचा - Manoj Jarange : जरांगे पाटलांकडून नवं 'चॅलेंज'; सातारा-हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासकांना आझाद मैदानावर बोलावले

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जी.टी रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपचारासाठी येत आहेत. अनेकांना डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, अशा सामान्य आजाराचा त्रास होत असल्याची माहिती आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com