शिंदे -फडणवीसांची कोंडी? '...तर मुंबईत धडकणार', हाकेंनी पण ठणकावले

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट 288 आमदार पाडू असा इशाराच दिला आहे. हे कमी की काय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही सरकारला दम भरला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
सांगली:

मराठा की ओबीसी? यांच्या कचाट्यात शिंदे- फडणवीस सरकार चांगलेच सापडले आहे. एकीकडे लोकप्रिय घोषणा करून जनमत बनवण्याची रणनिती महायुतीने केली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी यांचा प्रश्न शिंदे फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. आता तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट 288 आमदार पाडू असा इशाराच दिला आहे. हे कमी की काय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही सरकारला दम भरला आहे. जर सगे सोयरेची अंमलबजावणी झाली तर मुंबईत धडकू असे थेट सांगितले आहे. त्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्न सरकार समोर पडला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी मराठा बरोबरच ओबीसी समाजाला दुखावणे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लक्ष्मण हाकेंचा इशारा 

सगे- सोयऱ्यांचा अध्यादेश जर निघाला तर ओबीसी समाजाबरोबर आंबेडकरी जनता देखील मुंबईत धडकेलं,असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाक्के यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. तसेच जरांगेंच्या मोर्चाची पहिली मागणी ही ॲट्रॉसिटी रद्द करण्याची होती. त्यामुळे त्याचा विचार आंबेडकरी जनतेने देखील केला पाहिजे. असे हाके म्हणाले आहेत. सरकारने जर याबाबतचा जीआर काढला तर तो फक्त ओबीसी समाजाला नाही एससी आणि एनटी समाजाला देखील अडचणीचा ठरेल असा दावा त्यांनी केला आहे. ओबीसी समाजात आपण जनजागृती करणार आहोत. त्यासाठी मेळाल्याचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ...तर 288 उमेदवारांना पाडू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

जरांगेंनी ही  सरकारला दिला इशारा 

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम देखील आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाला न्याय द्या, आमची खदखद तुम्हाला परवडणारी नाही. सरकारला सावध करतो की आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास तुमचे 288 उमेदवार पाडू, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. कुणीही विरोध केला तरी सगेसोयरे अंमलबजावणी होणार आहे. आमचे आणि कुणबी समाजाचे निकष सारखेच आहेत. मराठा पोट जात म्हणून ओबीसीमध्ये घ्या, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार

सरकारचं टेन्शन वाढलं? 

विधानसभा निवडणुका काही महिन्याच्या अंतरावर आहेत. अशा वेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. तर ओबीसींनी आमच्या आरक्षणाला हात लावू नका असे सांगत आक्रमक भूमीका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर चालला होता. त्याचा फटका भाजप आणि महायुतीला बसला. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मराठा बरोबरच ओबीसी समाजाला दुखवून चालणार नाही याची चांगली कल्पना महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे यावर आता कोणता तोडगा काढायचा याचा विचार सरकार करत आहे. निर्णय घेण्यासाठी सरकारकडे ही आता कमी दिवस आहेत. त्यामुळे मराठा की ओबीसी या कात्रीत सरकार सापडले आहे. 
 

Advertisement