'होय राजीनामा द्या, पण त्या आधी...', मारकडवाडीत राजीनाम्यावरून पवारांसमोर काय झालं?

मारकडवाडीचा लढा माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्यापुढे आमदारकी काही नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे असं त्यांनी थेट शरद पवारां समोरच सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

मारकडवाडीला शरद पवारांनी आज भेट दिली. यावेळी त्यांच्या समोरच राजीनाम्या वरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याची पाहायला मिळाली. मारकडवाडी हे गाव ज्या मतदार संघात येतं त्या मतदार संघाचे आमदार उत्तम जानकर हे आक्रमक झाले होते. ते म्हणाले मारकडवाडीचा लढा माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्यापुढे आमदारकी काही नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे असं त्यांनी थेट शरद पवारां समोरच सांगितलं. पण त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जानकरांना सबुरीचा सल्ला देत माझ्या परवानगी शिवाय राजीनामा देवू नका असं जाहीर पणे सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माळशिरस मतदार संघाचे आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडी गावात जोरदार फडकेबाजी केली. समोर शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. यावेळी त्यांनी मतदाना दरम्यान घोळ झाल्याचा दावा केला. माझ्या शक्ती पेक्षा, माझ्या आमदारकी पेक्षा मारकडवाडीचा लढा हा मोठा. लोकशाहीत जर कोणाचं नुकसान होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे लोकशाहीचं नुकसान होवून आमदारकी मिळणार असेल तर ती महत्वाची नाही. आपण निवडणूक आयोगाला कळवलं आहे. त्यांनी माळशिरस मतदार संघात पोटनिवडणूक घ्यावी. एक ट्रायल म्हणून बॅलेटवर मतदान घ्यावं. मी खरोखर राजीनामा देतो असं त्यांनी शरद पवारां समरो सांगितलं. जे विधानसभेला मतदान झालं ते कोणालाही मान्य नाही. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांचे मारकडवाडीत जावून फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?

जानकर यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही मारकटवाडीतल्या गावकऱ्यां बरोबर संवाद साधला. त्यांनी जानकरांच्या भावना या तिव्र आहेत. त्याच प्रमाणे मारकटवाडीच्या गावकऱ्यांच्या भावनाही तिव्र असल्याचं सांगितलं. तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. तुम्हाला अनेक लोक भेटायला येतील. पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. जानकरांचं कौतूक करावं वाटतं. त्यांनी एक लढा हातात घेतला आहे. फक्त माझ्या परवानगी शिवाय राजीनामा देवू नका असे जयंत पाटील यांनी जानकरांना सांगितलं.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - कानडी अत्याचार! बेळगावात मराठी मेळाव्याला कर्नाटक सरकारची बंदी, महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही अडवणार

जर तुम्ही राजीनामा दिलाय तर पोटनिवडणुकीत तुम्हीच जिंकाल यात वाद नाही. त्याबाबत पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर आधी सरकारने जाहीर करावं की आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेवू. सरकारने तसं जाहीर केलं तर नक्की राजीनामा द्या. विजय हा तुमचाच आहे असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे सर्व राजीनाम्याचं कथन शरद पवारांच्या समोरच होत होते. पवार हे सर्व शांत पण ऐकत होते. पवारांनी मात्र हा लढा पुढे न्यायचा आहे असं सांगत राजीनामा नाट्यावर पूर्ण विराम देत. या लढ्याला पाठिंबा देत असल्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिला. शिवाय दिल्लीत या प्रश्नी आवाज उठवू असंही ते म्हणाले. 

Advertisement