जाहिरात

मोठी बातमी! राज ठाकरें शिवाय मनसेची बैठक, सरचिटणीस काय निर्णय घेणार?

सोमवारी दुपारी मनसे कडून मुंबईत एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये मनसेचे नेते आणि सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.

मोठी बातमी! राज ठाकरें शिवाय मनसेची बैठक, सरचिटणीस काय निर्णय घेणार?
मुंबई:

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसे कडून जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.सोमवारी दुपारी मनसे कडून मुंबईत एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये मनसेचे नेते आणि सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. मात्र या बैठकीला राज ठाकरे असणार नाहीत. त्यामुळे नेते आणि सरचिटणीस या बैठकीत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान प्रत्येक जिल्ह्या नुसार जे अहवाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेत त्यावर यामध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात नुकताच दौरा केला. गणेशोत्सवनंतर उर्वरित महाराष्ट्रातील त्यांचा दौरा होणार आहे. या दौऱ्यात मनसे कडून काही मतदार संघाची चाचपणी केली जाणार आहे. मनसे ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. त्यानुसार जवळपास 225 ते 250  जागा मनसे उमेदवार रिंगणात उतरवेल. त्यानुसार मनसेची तयारीही सुरू आहे. याबाबत सोमवारी होणारी बैठक ही महत्वाची समजली जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - भावी मुख्यमंत्री! महायुतीत आता 'या' दोन नेत्यांचे झळकले बॅनर

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर महायुतीत तिन पक्ष असताना मनसेला किती जागा मिळतील याबाबत शंका होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. शिवाय महाराष्ट्र दौऱ्याचेही आयोजन केले. काही ठिकाणी उमेदवारांची ही घोषणा केली. गेल्या दहा वर्षात मनसेला हवं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची समजली जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - CM Arvind Kejriwal resigns : केजरीवालांची मोठी घोषणा, 2 दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन!

गेल्या दहा वर्षात मनसेतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मनसेची संघटनात्मक ताकद ही कमी झालेली आहे. त्यामुळे मनसेला  ही निवडणूक म्हणजे वाटते तेवढी सोपी नाही. मराठी सोबतच मनसेने गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. राज्यात युती विरुद्ध आघाडी अशी लढत आहे. त्यात मनसे किती टिकाव धरू शकेल हे पाहावं लागणार. हे सर्व पाहात मनसेची सोमवारी होणार बैठक महत्वाची ठरणार आहे. यात मनसे काही वेगळा निर्णय घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
शरद पवारांचा नवा डाव, भाजपाला देणार हादरा! दसऱ्यानंतर बडा नेता करणार सीमोल्लंघन?
मोठी बातमी! राज ठाकरें शिवाय मनसेची बैठक, सरचिटणीस काय निर्णय घेणार?
mns worker wing leader manoj Chavan facebook post says amit Thackeray should contest from Bhandup
Next Article
अमित ठाकरेंनी आमच्या मतदारसंघातून लढावे! मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली इच्छा