राज ठाकरेंचं ठरलं! विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची केली घोषण

मनसे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही राज ठाकरे यांनी केला. विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले

Advertisement
Read Time: 1 min

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्ष विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले दोन उमेदवार देखील जाहीर करत आघाडी घेतली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत पत्रक जारी करत सांगितलं की, राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा  सुरु आहे. आज (5 ऑगस्ट) सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगांवकर आणि ⁠पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात येत आहे. 

(नक्की वाचा- "राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये", राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा)

विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार

लोकसभा निवडणुकीत केलेली युती नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी होती, हे तेव्हाच जाहीर केलं होते. मनसे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही राज ठाकरे यांनी केला. विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले.