राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या टप्प्यात 'या' भागावर फोकस

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून (रविवार, 4 ऑगस्ट) सुरुवात होत आहे

Advertisement
Read Time: 2 mins
R
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना  आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून (रविवार, 4 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. 

राज ठाकरे पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर फोकस करणार आहेत. पुण्यात पूरग्रस्त नागरिकांशी राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चा करणार असून त्यानंतर ते सोलापूरकडं रवाना होतील. राज यांनी मागच्या आठवड्यातही पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला होता.

सोलापूर, धाराशिव, नांदेड ,लातूर, हिंगोली, परभणी, बीड जालना ,संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरे या  मराठवाड्यातील जिल्ह्यात मुक्काम करणार असून पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन संबंधित जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम

5 ऑगस्ट- सोलापूर
6 ऑगस्ट- धाराशिव
7  ऑगस्ट- लातूर
8 ऑगस्ट- नांदेड
9 ऑगस्ट- हिंगोली
10 ऑगस्ट- परभणी
11 ऑगस्ट- बीड
12 ऑगस्ट- जालना
13 ऑगस्ट- छत्रपती संभाजीनगर

Advertisement

( नक्की वाचा : जरांगे पाटील विधानसभेला कुणाला तिकीट देणार? वाचा अटी, शर्थी आणि नियम! )
 

मनसे किती जागा लढवणार?

राज ठाकरे यांनी यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. विधानसभेच्या 225 ते 250 जागा मनसे लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्यालाच तिकीट दिले जाईल असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तिकीट मिळाले की पैसे काढायला मोकळा अशा प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देणार नाही असेही राज यांनी सांगितले होते.

Topics mentioned in this article