
मनोज सातवी
मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी आग्रही भूमिका घेत मुंबई अमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेलवर लावलेल्या गुजराती पाट्या तोडल्या. हालोली गावाजवळील सरोवर हॉटेलची पाटी तोडून आंदोलकांनी मराठी पाट्या सक्तीने लावण्याची जोरदार मागणी केली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते गुजरात सीमेवरील आच्छाडपर्यंत असणाऱ्या मोठ्या प्रमाणात हॉटेल्सच्या पाट्या ह्या गुजरातीमध्ये होत्या. याविषयी आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालघर सह वसई मधेही आंदोलन करत ह्या पाट्या काढायला सुरुवात केली आहे.
मनसेच्या मराठी पाट्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या काही हॉटेल चालकांनी काळा कपडा टाकून गुजराती पाट्या झाकण्याचा प्रयत्न केला. तर काही हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःहून गुजराती पाट्या उतरवायला सुरुवात केली आहे. लवकरच मराठी पाट्या लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र मराठी पाट्या न लावणार्या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या कामगार विभागाकडून कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा - Kalyan News: वाह रे अधिकारी! एकाच दिवशी KDMCचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात
सदर हॉटेलवर या अगोदर मराठी पाटी होती. मात्र आता ते गुजराती व्यावसायिकाला चालवण्यासाठी दिल आहे. त्याने ही पाटी कधी बदलली याची माहिती नाही. मात्र आता तात्काळ त्या ठिकाणी मराठी पाटी लावण्याची सुचना दिल्याचे हॉटेलचे मालक भरत पाटील यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणाऱ्या हॉटेल चालकांनी मराठी भाषेत पाट्या ठळकपणे लावणे कायद्याने बंधनकारक आहे. मराठी भाषे व्यतिरिक्त इतर भाषेत पाट्या लावणाऱ्या हॉटेलांवर मुंबई दुकाने संस्था अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असं कामगार उपायुक्त विजय चौधरी यांनी सांगितले.
शिवाय या अगोदर कामगार विभागाने एकूण 233 आस्थापनांना भेटी दिलेल्या असून, यापैकी मराठी फलक नसलेल्या आस्थापना ची संख्या 86 आहे. मराठी फलक असलेल्या आस्थापना 112 असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर निरीक्षण भेटी नंतर 33 आस्थापनांनी मराठी फलक लावले आहे. तर 17 आस्थापनांवर कारवाई करण्यात आलेल्यांची माहिती कामगार उपायुक्त कामगार उपायुक्त विजय चौधरी यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world