जाहिरात

Mumbai BJP Rada: भाजपाच्या दोन गटात जोरदार राडा, मंत्र्यांसमोरच एकमेकांना भिडले

पोलिसही त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा तुफान राडा झाला.

Mumbai BJP Rada: भाजपाच्या दोन गटात जोरदार राडा, मंत्र्यांसमोरच एकमेकांना भिडले
मुंबई:

मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होवू शकते. त्यामुळे भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार हे मुंबईतल्या प्रत्येक प्रभागत भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांना भेटत आहेत. त्यांची मते ही जाणून घेत आहेत. अशातच ते शुक्रवारी कांदीवलीत गेले होते. त्यावेळी त्यांच्या समोरच भाजपचे दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी जोरदार राडा झाला. शेवटी प्रकरणी पोलिस स्टेशनपर्यंत ही पोहोचले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कांदिवली पूर्वेत जानुपाडा परिसरात मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार आज सकाळी व्हिजिटला आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. भाजपा पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांचे समर्थक यावेळी एकमेकांना भिडले होते, असा आरोप केला जात आहे. आहा आरोप दोन्ही गट एकमेकां विरुद्ध करत आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार मंत्री आशिष शेलार यांच्या समोर झाला. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

पोलिसही त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा तुफान राडा झाला. यानंतर समता नगर पोलिसांनी काही भाजपा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. शिवाय त्यांना पोलीस स्टेशनला आणले गेले. यावेळी कुणी विरुद्ध तक्रा दाखल करू नका अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भाजप पदाधिकारी असलेले देवांग दवे हे आक्रमक झाले होते. जो काय गोंधळ आज झाला.  त्याची दखल पक्षाचे वरिष्ठ नेते नक्की घेतली. शिवाय संबंधितावंर कारवाई करतील असं आश्वासन मात्र भाजप कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आलं. 

ट्रेंडिंग बातमी - sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनम! एकदा नाही, दोनदा नाही, तर 'इतक्या' वेळा केला होता राजाला मारण्याचा प्रयत्न

पण मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद मात्र या निमित्ताने समोर आला आहे. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक असणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मोर्च बांधणी केली जाते. शिवाय स्थानिक पातळीवर शक्ती प्रदर्शनही केले जात आहे. वर्चस्वासाठीच हा राडा झाल्याचं बोललं जात आहे. ज्या भागात हा राडा झाला तिथे भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांची ताकद आहे. तर प्रकाश दरेकर हे त्यांचे बंधू आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com