BMC Elections : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख ठरली? कधीपासून होणार सुरुवात?

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Municipal Elections : विधानसभा निवडणूक होऊ कित्येक महिने लोटले तरी अद्याप महापालिका निवडणुकांचा घोषणा झालेली नाही. आज होईल... उद्या होईल असं म्हणत सलग तीन वर्ष राज्यात महापालिका निवडणूका झाल्या नाहीत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचाही उत्साह मावळला आहे. दरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका ऑक्टोबरनंतर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली.  यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तरी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आगामी 4 मेला सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. 

नक्की वाचा - CM Devendra Fadnavis : नागपुरात नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी विधानसभेत घटनाक्रम सांगितला

ओबीसी राजकीय आरक्षण आणि प्रभाग पुनर्रचना बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मे महिन्यात निकाल लागला तरी देखील महानगर पालिका पावसाळ्याअगोदर होणार नाहीत, असंच दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल लागल्यानंतर जवळपास 100 दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे. कोर्टाने निकाल दिल्यानंतर पालिकेला जवळपास 100 दिवस आढावा आणि तयारीसाठी वेळ लागणार असल्याची माहिती आहे. 

Advertisement