नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदार संघातून पराभव झाला. त्यानंतर काही काळ त्या सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होत्या. नुकत्याच त्या अमरावतीत एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईनचा सुर आळवला. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी नवनीत यांचा पराभव कोणामुळे झाला हेच जाहीर पणे सांगितले. पराभव झाला असला तरी भविष्यातील आपले नियोजन काय असे हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा पराभवानंतर नवनीत राणा आता नव्याने मतदार संघात सक्रीय झाल्या आहेत. त्या बऱ्याच कालावधीनंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या. मी माझ्या परीक्षेत फेल झाली. पण मेरिटमध्ये येणार विद्यार्थी नापास झाला तर त्याच दुःख काय असते ते मला माहिती आहे असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. कदाचीत कुठे तरी मी कमी पडली असेल. पण पुन्हा नव्याने तयारीला लागणार आहे. अमरावतीच्याच मैदानात आपण नक्की उतरणार आहे असे सांगत या पुढेही राजकारणात सक्रीय राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? तो आमदार कोण?
नवनीत राणा यांच्या पराभवाला स्थानिक नेते जबाबदार आहेत. नवनीत राणा यांचा पराभव व्हावा यासाठी सगळे नेते एकत्र आले होते. त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला. पण नवनीत राणा यांचा पराभव करून काही राजकीय नेत्यांचं जरी भलं झालं असलं तरी अमरावती जिल्ह्याचं मोठं नुकसान झाले आहे असे यावेळी आमदार रवी राणा म्हणाले. जिल्ह्याला एक विकासाचं व्हिजन देण्याचे काम नवनीत राणा यांनी केलं होतं, तेच व्हिजन थांबवलं गेलं असं ही ते म्हणाले. देशात जे काही मोजकेच खासदार चर्चेत होते त्या पैकी एक नवनीत राणा होत्या. त्यांचं नाव देशात होते असेही रवी राणा म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं
नवनीत राणा यांचा लोकसभेत झालेला पराभव रवी राणांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राणा यांना पराभूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचा राणा यांचा आरोप आहे. महायुतीतील बच्चू कडूंनी तर राणा यांना जाहीर विरोध केला होता. शिवाय त्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवारही मैदानात उतरवला होता. काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला.