राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. अजित पवार जवळपास 40 आमदार घेवून वेगळे झाले. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मात्र शरद पवारांनी अजित पवारांना चितपट केले. आता हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा शिवनेरीतून सुरू झाली आहे. ही यात्रेच्या सुरूवातीला पक्षाचा मेळावा झाला. हा मेळावा जर कोणी गाजवला असेल तर तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी. यावेळी त्यांनी अजित पवारांना त्यांच्या गृह जिल्ह्यात खडे बोल सुनावले. त्यांनी केलेल्या टिकेची सध्या जोरदार चर्चा पुणे जिल्ह्यात होता आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'लाडकी बायको नसते, तर...'
मेहबूब शेख हे पहिल्यापासून शरद पवारां बरोबर राहीले आहेत. पक्षात फुट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारां बरोबर राहाणेच पसंत केले. त्यांच्यावर पक्षाने युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. ज्यावेळी शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी अजित पवारांना चव्हाण सेंटरमध्ये भिडणारे हे मेहबूब शेख हेच होते. आता तर दोघांचे पक्ष ही वेगळे आहेत. अशा वेळी शेख हे अजित पवारांवर तुटून पडले आहेत. निमित्त आहे ते शिव स्वराज्य यात्रेचे. या यात्रे वेळी त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केले. बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं आहे, लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणचं असते. त्यामुळे या सरकारला आता लाडकी बहीण आठवली आहे असा हल्लाबोल केला. बारामती लोकसभेमध्ये अजित पवारांनी आपल्या पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्या पार्श्वभूमिवर शेख यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला
'वीस वर्षे दूध पाजले तेच डसले'
मेहबूब शेख यांनी यावेळी जोरादार बॅटींग केली. नागपंचमी असल्याने त्याचा ही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात करत अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांना टार्गेट केले. ते म्हणाले आज नागपंचमी आहे, आज नागाला दूध पाजले जाते. पण पवार साहेबांनी ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला. दूध पाजणाऱ्या पवार साहेबांना ते डसले अशा शब्दात त्यांनी दादा गटावर हल्ला चढवला. फुटून गेलेल्या सर्वांचा उल्लेख त्यांनी दूध पाजलेले नाग असा केला.
'परतीचे दोर, अलीबाबा चाळीस चोर'
शरद पवारांना सोडून अनेक आमदार अजित पवारांकडे गेले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर अनेकांचे धाबे दणाणले. त्यांनी पुन्हा शरद पवारांकडे येण्याच्या हालचाली सुरू केल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. यावरही महेबूब शेख यांनी वक्तव्य केले. वल्लभशेठ बेनके यांनी जे पेरलं ते का उगवलं नाही. आता काही लोक आपल्याकडे हेलपाटे मारत आहे. या वेळी त्यांनी अतूल बेनके यांचे नाव घेण्याचे टाळले. अनेकांना परतीचे डोहाळे लागले आहे. पण जे लोकसभेआधी आले त्यांचं स्वागत केले आहे. पण जे उरलेत ते 'अली बाबा चाळीस चोर'आहेत असं म्हणत त्यांनी सभास्थळ गाजवून सोडले.