रामराजे शिंदे, प्रतिनिधी
NDA And MahaAghadi Manifesto For Bihar Election 2025 : बिहारच्या जनतेसाठी एनडीए आणि महाआघाडीनं आपआपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. एनडीएनं महिला सक्षमीकरण हा मुख्य केंद्रबिंदू आहे. शिवाय बिहार मधील युवकांना रोजगार देण्याचं वचनही एनडीएनं जाहीरनामा मधून दिलं आहे. तर महाआघाडीनं पण महिला तरूणाई बाबत मोठी आश्वासनं दिली आहेत. बिहारच्या मागील निवडणूकीत महिला मतदारांनी एनडीएची साथ दिली होती. यावेळीही जाहीरनाम्यात एनडीएचा फोकस महिला सशक्तीकरणावर दिला आहे. दरम्यान, एनडीए आणि महाआघाडी यांनी जाहीरनाम्यातून कोणती आश्वासनं दिली आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
एनडीएनं महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या?
- मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांना व्यावसाय सुरू करण्यासाठी २ लाखांपर्यंतचे आर्थिक मदत केली जाणार आहे.
- 10 लाख महिलांना लखपती दीदी तयार करण्याचे लक्ष्य आहे.
- यशस्वी महिला उद्योजकांना उद्योग वाढविण्यासाठी ‘मिशन करोडपती' सुरू केले जाणार.
- तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडीनंही महिला मतदारांसाठी योजना आणण्याचं आश्वासन दिलंय.
महाआघाडीची महिलांसाठी घोषणा
- माई बहिण योजनेतून महिलांना अडीच हजार रूपये दिले जातील
- जीविका दीदींना कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जाणार. महिना ३० हजार रूपये दिले जाणार.
- महिला शिक्षक - महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना घरापासून जवळ ७० किमी परिसरात पोस्टिंग दिली जाईल.
प्रत्येक मंडळात महिला कॅालेज स्थापन केले जाईल
एनडीए आणि महाआघाडी मध्ये महिलांसाठी योजना आणण्याची स्पर्धा लागली आहे. बिहारमध्ये महिला वोट बॅंकनंतर दुसरा मुद्दा आहे बेरोजगारांचा. म्हणूनच व्यावसाय आणि नोकरी देण्याचे आश्वासन दोघांनीही दिलं आहे.
नक्की वाचा >> भरदिवसा प्रसिद्ध कबड्डीपट्टूची गोळ्या झाडून हत्या! मित्रांच्यासोबत गेला अन् नको ते घडलं..
एनडीएचे तरूणाईला आश्वासन…
- एनडीएनं 1 कोटी पेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या आणि रोजगार दिले जाणार असल्याची घोषणा केलीय.
- प्रत्येक जिल्ह्यात मेगा स्किल सेंटर्स स्थापन करून बिहारला जागतिक कौशल्य केंद्र म्हणून स्थापित करा.
- प्रत्येक विभागात (प्रमंडल) बिहार स्पोर्ट्स सिटी आणि 'सेंटर ऑफ एक्सलन्स' खेळांसाठी.
- प्रत्येक जिल्ह्यात कारखाने आणि 10 नवीन इंडस्ट्री पार्क बांधण्याचे आश्वासनही दिले आहे.
- 100 एमएसएमई पार्क आणि 50000 हून अधिक कुटीर उद्योग
महाआघाडीचं रोजगाराचे आश्वासन
- प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल.
- सरकार स्थापन झाल्यानंतर 20 दिवसांच्या आत कायदा केला जाईल.
- 20 महिन्यांच्या आत नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
- पदवीधर तरुणांना २ हजार रूपये आणि पदव्युत्तर तरुणांना 3 हजार दरमहा बेरोजगारी भत्ता मिळेल
नक्की वाचा >> RRB Jobs 2025 रेल्वेत सर्वात मोठी भरती! 2500 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, 'ही' आहे शेवटची तारीख
शेतीसाठी एनडीएची घोषणाः
- सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (किमान आधारभूत किंमत) ची हमी.
- किसान सन्मान निधी ६ हजार वरून ८ हजार रूपये पर्यंत वाढविली जाणार
- कृषी-पायाभूत सुविधांमध्ये १ लाख कोटी गुंतवणूक.
- बिहारला दक्षिण आशियातील टेक्सटाईल आणि सिल्क हब म्हणून विकसित केले जाणार आहे.
- महाआघाडीच्या शेतक-यांसाठी कोणत्या घोषणा
- शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) सर्व पिकांच्या खरेदीची हमी दिली जाईल.
- मंडी आणि बाजार समित्या पुनरुज्जीवित केल्या जातील. विभागीय, उपविभागीय आणि ब्लॉक पातळीवर मंडी उघडल्या जातील आणि एपीएमसी कायदा पुन्हा अंमलात आणला जाईल.
- न्हावी, कुंभार, सुतार, लोहार, चांदी, माळी इत्यादी जातींना स्वयंरोजगारासाठी ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांचे एकवेळ व्याजमुक्त कर्ज दिले जाईल.
- कृषी-आधारित उद्योग, अन्न प्रक्रिया आणि दुग्धजन्य उद्योगांमध्ये कौशल्य-आधारित रोजगार निर्माण केला जाईल.
- 200 युनिट वीज मोफत दिली जाईल.