NDTV Marathi Manch: 'धारावीचा प्रकल्प लोकांचं जिवनमान उंचावणारा' एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले

गरीबांचे जिवन उंचावले पाहीजे. धारावीत ते कित्येक वर्ष त्याच अवस्थेत खितपत पडले आहेत, असं शिंदे यावेळी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. धारावी म्हटलं की तिथला चिखल, उघडी गटारं, वाहतं पाणी, तिथेच लोक राहातात, तिथेच व्यवसाय करतात. त्याचं जिवनमान उंचावण्याची गरज होती. त्यांना हक्काची घरं देणं गरजेचं होतं. ते काम धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून होत असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. ते  एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ))

धारावीत लाखो लोक खूप वाईट अवस्थेत राहातात. त्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. जवळपास पात्र 2 लाख लोकांना तिथेच घर मिळणार आहे. तर अन्य लोकांना मुंबई इतर ठिकाणी घर दिलं जाईल. जी घरं दिली जाणार आहेत, त्याची किंमत जवळपास एक कोटीच्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत चांगलं घर या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळेल. बंगले फक्त आम्हीच बांधायचे का? गरिबांचे ही जिवन सुधारले पाहीजे ही आपली भूमीका आहे. आपल्या सरकारची भूमीका आहे असं शिंदे यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - NDTV Marathi Manch: पायाभूत सुविधा, दळणवळ, पर्यटन यावर सरकारचा भर, शिंदेंनी रोडमॅप सांगितला

गरीबांचे जिवन उंचावले पाहीजे. धारावीत ते कित्येक वर्ष त्याच अवस्थेत खितपत पडले आहेत. त्यांनी असं किती वर्ष राहायचं. त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. त्याला स्पेशल स्टेटस देण्यात आलं आहे. सरकारने हा प्रकल्प करायला देताना त्यात कडक अटी शर्ती घातल्या आहेत. त्याचा थेट लाभ लोकांना मिळणार आहे. या प्रकल्पात सरकारही भागिदार आहे. त्यामुळे दोन लाख लोकांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते आम्हाला दुवा दिल्या शिवाय राहाणार नाहीत असं ही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - NDTV Marathi Manch: वाढवण बंदर गेमचेंजर ठरणार, नितेश राणेंना विश्वास

दरम्यान मुंबईत इतर पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे 40 लाख घरं मोफत देण्याचं स्वप्न होतं. ते आता पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. मुंबईतल्या घरांबरोबरच आरोग्यावरही आपण काम करत आहोत. मुख्यमंत्री असताना आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 400 कोटी पेक्षा जास्तचा निधी वितरीत केला असं ही ते आवर्जून म्हणाले. केईएम रुग्णालयात आता औषधांची अडचण येणार नाही. पहिली ती बाहेरून घ्यावी लागत होती, ती आता घ्यावी लागणार नाही. अशीच व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्याचा प्रयत्न असल्याचं ही ते म्हणाले. 
 

Advertisement