संकेत कुलकर्णी
राज्यात माढा मतदार संघ हा कायमच चर्चेत असतो. येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही हा मतदार संघ चर्चेत आला आहे. माढा मतदारसंघाचे बबन शिंदे हे विद्यमान आमदार आहे. मात्र त्यांच्या विरोधात आता त्यांच्या पुतण्यानेच दंड थोपटले आहेत. त्यांनी थेट चुलत्या विरोधात प्रचाराचा नाराळ फोडला आहे. समोर कोणी असो आपण निवडणूक लढणार अशी घोषणाच त्यांनी केली आहे. आमदार बबन शिंदे यांचे धनराज शिंदे हे पुतणे आहेत. त्यांनी सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर बबन शिंदे हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे राज्यातील चुलत्या- पुतण्याच्या लढतीची किनार आता माढा मतदारसंघात ही आहे. परिणामी माढ्याच्या राजकारणाचा तिढा वाढला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीनंतर माढा मतदारसंघात विधानसभेला देखील बंडाचे निशाण पुढे आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध मोहिते पाटील यांनी बंड केले. माढा मतदार संघातून भाजप उमेदवाराला हद्दपार केले. यानंतर आता विधानसभेला आमदार बबन शिंदे या आपल्या चुलत्याच्या विरुद्ध धनराज शिंदे यांनी दंड थोपटत मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. शिवाय आपल्याला माढ्यातून उमेदवारी मिळावी अशी मागणीही केली होती.
ट्रेंडिंग बातमी - अमित शहांचेही कापले होते तिकीट, त्यावेळचा किस्सा काय? अमित शहांनी स्वत: सांगितलं
आमदार बबन शिंदे यांनी येत्या निवडणुकीसाठी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. त्यामुळे भाऊबंदकीचा वादात राजकीय वारसदार म्हणून, आता धनराज शिंदे यांनी आपला गट तयार करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रचाराला ही सुरुवात केली आहे. माढा मतदार संघातील निर्णायक मतदान देणारा मानेगाव या जिल्हा परिषद गटात धनराज शिंदे यांनी जाहीर सभा घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'मी विधानसभेत दिसणार' निलेश राणेंच्या घोषणेनं कोणाचा पत्ता कट होणार?
विशेष म्हणजे चुलत्याच्या विरोधात बंड करणाऱ्या धनराज शिंदे यांचा अजून पक्ष ठरला नाही. मात्र मानेगावच्या प्रचाराच्या पहिल्या सभेत नागरिकांनी धनराज शिंदे यांना तुतारी हाती घेण्याचा आग्रह केला. काही दिवसापूर्वी धनराज शिंदे यांनी शरद पवारांची पण भेट घेतली. आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह हे अपक्ष अथवा घड्याळावर निवडणूक लढवतील. अशी शक्यता आहे. यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे धनराज शिंदे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी होत आहे. त्यामुळे चुलता पुतण्याची लढत आता माढा मतदार संघात दिसणार.हे निश्चित झाले आहे.
ट्रेंडिंग बातमी - बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरमधून अटक, तपासात धक्कादायक माहिती आली समोर
माढा मतदार संघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेकांचा ओढा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. धनराज यांच्या प्रमाणे आणखी काही इच्छुकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. अशा वेळी अन्य कोणाला उमेदवारी मिळाली तर काय करणार असा प्रश्न धनराज यांना करण्यात आला. कारखानदार सोडून अन्य कोणा ही सर्व सामान्याला उमेदवारी मिळणार असेल तर आपण त्याचे काम करू. पण आपल्याला शरद पवार उमेदवारी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.