उल्हासनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एका बांगलादेशी कुटुंबाला अटक केली आहे. हे संपूर्ण कुटुंब अनधिकृत पणे भारतात राहात होते. विशेष म्हणजे यातील रिया उर्फ बन्ना शेख ही पोर्टस्टार आहे. चौकशीत ही बाब समोर आली आहे. तिचे कुटुंब बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून उल्हासनगरच्या नेवाळी इथे राहात होते. अशी माहिती पोलिस प्रवक्ते शैलेश साळवी यांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपली ओळख लपवून रिया उर्फ बन्ना शेख ही आपल्या कुटंबा बरोबर उल्हासनगरमध्ये राहात होती. तिच्या आईने भारतात राहाता यावे म्हणून अमरावतीच्या एका व्यक्ती बरोबर लग्नही केले होते. त्यानंतर ती मुलगा मुली पतीसह उल्हासनगरमध्ये राहात होती. तर रिया ही पॉर्न इंटस्ट्रीमध्ये होती. पॉर्न स्टार म्हणून तिची ओळख होती. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे सर्व जण अवैध पद्धतीने राहात असल्याचे समोर आले. शिवाय त्यांच्या विरोधात भारतात अवैध पद्धतीने राहाण्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - वरिष्ठाने सुट्टी नाकारली, 30 वर्षांच्या महिलेचा ऑफिसमध्येच मृत्यू
भारतात राहाण्यासाठी रिया आणि तिच्या कुटुंबाने खोटी कागदपत्र तयार केली होती. त्यासाठी त्यांनी अमरावतीच्या एका व्यक्तीची मदत घेतली होती. हे चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर रिया हीने पॉर्न इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण केला. तिला पॉर्न इंडस्टीमध्ये आरोही या नावानेही ओळखले जाते. ती अनेक प्रोडक्शन हाऊसच्या संपर्कात होती हे ही चौकशीत समोर आले आहे. या इंडस्ट्रीत तिने चांगला जम बसवला होता. मात्र तिच्या सर्वा डाव आता पोलिसांनी उधळवून लावला आहे. यांना मदत करणारे आणखी कोणी आहेत का याचा तपासही पोलिस करत आहेत.
पोर्नस्टार रिया बर्डे, भारतीय पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आरोही बर्डे आणि बन्ना शेख म्हणूनही ओळखले जाते, तीला बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहण्याच्या आरोपाखाली उल्हासनगर येथील हिल लाइन पोलिसांनी अटक केली आहे.रिया मूळची बांगलादेशी असल्याचा आरोप आहे आणि ती, तिची आई, भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे बनवून भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत. विशेष बाब म्हणजे बांगलादेशी असूनही भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी रियाच्या आईने अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केले होते. सध्या पोलिसांनी या प्रकरणात रिया तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - रक्ताच्या नमुन्याची आदला-बदली की अजून काही? पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा नवा अँगल
अटक करण्यात आलेली रिया राज कुंद्राच्या निर्मितीशी संबंधित आहे. तिने अनेक पॉर्न चित्रपटांमध्ये काम केल्याचेही समोर आले आहेयाशिवाय पॉर्न इंडस्ट्रीत रियाला तिच्या आरोही नावानेही ओळखले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संग्राम मालकर करत आहेत. त्यांनी सांगितले की तपासात असे दिसून आले की रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी आहे. ती तिच्या दोन मुली रिया आणि मुलासह भारतात अवैधरित्या घुसल्या होत्या. रियाच्या आईने पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगून अमरावती येथील रहिवासी अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केले. नंतर स्वत:चे आणि तिच्या मुलांचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवले. इतर बनावट कागदपत्रे ही बनवले. त्या आधारावर भारतीय नागरिकाचा पासपोर्ट मिळवला. रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain Update : यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात किती मिमी पाऊस झाला?
मुंब्रा, कळवा, कल्याण, उल्हासनगर या भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहात अशी तक्रारी वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. हे सर्व जण अवैध पद्धतीने भारतात घुसतात. त्यानंतर ज्या ठिकाणी काम मिळेल त्या ठिकाणी राहायला ही सुरूवात करतात. बांगलादेशची सध्याची स्थिती पाहात मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे हे भारतात येत आहेत. त्यामुळे अवैध पद्धतीने घुसणाऱ्या या लोकांवर कारवाईची मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world