कल्याण-डोंबिवली महापालिकेत चाललंय तरी काय? महापौर-उपमहापौरांना ना गाडी, ना चालक, ना सुरक्षा रक्षक..कारण काय?

केडीएमसी महापौरची निवडणूक पार पडून तिसरा दिवस उजाडला तरी महापौर आणि उपमहापौरांना महापालिकेकडून गाडी,गाडीचा चालक लिपक,सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
KDMC Mayor And Deputy Mayor latest News
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

KDMC Mayor And Deputy Mayor News :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. निवडणूक पार पडून तिसरा दिवस उजाडला तरी महापौर आणि उपमहापौरांना महापालिकेकडून गाडी,गाडीचा चालक आणि लिपक,सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही.यामुळे महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महापालिकेची निवडणूक 15 डिसेंबर रोजी जाहिर झाली.निवडणूकीची आचार संहिता लागू झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात झाली.15 जानेवारी रोजी मतदान झाले.16 जानेवारीला  निकाल जाहिर झाला. निवडणुकीत 122 नगरसेवक निवडून आले.परंतु, महापौर आणि उपमहापौरांना महापालिकेकडून गाडी,गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षका न दिल्याने महापालिकेच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा >>  भविष्यात मुंबई–पुणे 'एक्स्प्रेस वे'वर ट्रॅफिक जॅम होणार नाही? तज्ज्ञांचा सरकारला मोठा सल्ला, खासगी गाड्यांवर..

पहिल्याच दिवसापासून महापौर-उपमहापौर सुविधांपासून वंचित 

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूकीच्या आदल्या दिवसापर्यंत महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाची डागडुजीचे काम संपलेले नव्हते. महापालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याचं सांगितलं जातंय. महापौरांना गाडी नाही,गाडीसाठी चालक नाही,लिपिक नाही,शिपाई नाही आणि सुरक्षा रक्षकही नाही. या सोयी सुविधा प्रशासनाकडून पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवसापासून महापौर आणि उपमहापौरांना या सुविधांपासून वंचित राहावं लागलं आहे. 

नक्की वाचा >> Viral Couple : कॉर्पोरेटची नोकरी सोडून लंडनमध्ये पाणीपुरीला बनवलं ब्रँड; नागपूरच्या मराठी कपलची सर्वत्र चर्चा

दरम्यान, अन्य महापालिकेतील यंत्रणा तातडीने कामाला लागली होती. ती तत्परता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाकडून दाखविण्यात आली नाही.प्रशासनाकडून मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देण्यात आले. उपमहापौरांनी याबाबत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. तेव्हा तातडीने 19 लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या.त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांना लिपीक उपलब्ध करुन देण्यात आले. 

Advertisement