'...म्हणून राजीनामा देऊन प्रायश्चित करा' शिंदेंनी केले वर्षाचे महिने, वडेट्टीवार थेट बोलले

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षाचे महिने केले. शिवाय वरून चुक मान्य करत नाहीत असे म्हटले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

दोन महिन्यात आरोपीला फाशी दिली या वक्तव्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाक युद्ध चांगलेच रंगले आहे. ज्या प्रकरणाचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता ते प्रकरण 2022 मध्ये पुणे जिल्ह्यात मावळमध्ये घडले होते. त्याबाबतचा खुलासा शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर केला होता. शिवाय त्यातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. त्याचाच आधार घेत आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षाचे महिने केले. शिवाय वरून चुक मान्य करत नाहीत. अशा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन  प्रायश्चित केलं पाहीजे अशी मागणी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्त दिले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटवरून म्हटलं आहे की  मुख्यमंत्री साहेब, गुन्हा घडला ऑगस्ट 2022 मध्ये! तेव्हा तुम्ही सत्तेसाठी फोडाफोडी करून सुरत -गुवाहाटी - गोवा करून महाराष्ट्रात आले होते. त्या काळात संपूर्ण महाराष्ट्र अस्थिर होता. त्यानंतर दोन वर्षाने न्यायालयाने फाशी सुनावली. ती तारीख होती मार्च 2024.पण तुम्ही काय बोलताय 2 महिन्यात शिक्षा सुनावली! प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा नादात तुम्ही वर्षाचे महिने केले, वरून चूक मान्य करत नाही. विरोधकांना शिव्या घालण्यापेक्षा महाराष्ट्राची जी अवस्था तुम्ही करून ठेवली,ते योगदान मान्य करा आणि राजीनामा देऊन प्रायश्चित करा.अशी थेट मागणीच विडेट्टीवार यांनी केली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'दोन महिन्यात फाशीची शिक्षा', मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यात तथ्य किती? सत्य आले समोर

सर्व आरोप होत असताना शिवसेनेने तारखेसह हा घटनाक्रम सांगितला होता. महायुती सरकारच्या काळात गुन्हेगाराला अभय नाही. आमच्या बहिणी लाडक्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य होणार नाही, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही म्हणजे नाहीच. विरोधकांनी दुर्दैवी प्रकरणाचे राजकारण करणे थांबवावे. न्यायासाठी पाठीशी उभे राहावे. राजकारण होतच राहील, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शिवाय या ट्विटमध्ये तारखाही दिल्या होत्या. त्यात दोन महीन्यात फाशी झाली नाही हे स्पष्ट होत आहे. त्याचाच आधार वडेट्टीवार यांनी घेतला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लैंगिक अत्याचार, हत्या अन् मृतदेह ऊसाच्या शेतात फेकला; मामाच्या कृत्याने कोल्हापूर हादरलं! 

बदलापूर प्रकरणानंतर राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बदलापुरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला सोडणार नाही असं सांगितलं होतं. शिवाय बदलापूर सारखेच एक प्रकरण घडले होते. त्या प्रकरणात दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा दिली होती, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली. ती घटना नक्की कोणती असा प्रश्न विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर नक्की त्याच आरोपीला फाशी दिली का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तर याबाबत एसआयटी चौकशी लावावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. 

Advertisement