जाहिरात

Pavanraje Nimbalkar: सर्व जण निर्दोष मग, पवनराजेंचा खून कुणी केला? राणा जगजितसिंह पाटलांनी थेट सांगितले

खोलात गेलात तर तुम्हाला सर्व काही समजले असं ते म्हणाले. आता ही हत्या कुणी केली हे समोर आलं पाहीजे असं ही ते म्हणाले.

Pavanraje Nimbalkar: सर्व जण निर्दोष मग, पवनराजेंचा खून कुणी केला? राणा जगजितसिंह पाटलांनी थेट सांगितले
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात १७ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले आहेत
  • माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात हे राजकीय षडयंत्र होतं असं मुलागा राणा जगजितसिंह पाटील सांगितलं
  • हत्या प्रकरणातील षडयंत्र कोण करीत होता याबाबत राजकीय आणि सामाजिक संदर्भ ही राणा यांनी दिले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

पवनराजे निंबाळकर हत्ये प्रकरणी तब्बल 17 वर्षानंतर कोर्टाचा निकाल आला. यात माजी मंत्री आणि पवनराजेंचे चुलत बंधू डॉ. पद्मसिंह पाटील हे आरोपी होते. त्यामुळे कोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोर्टाने अखेर या हत्या प्रकरणाचा निकाल देत सर्वा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र या निकालानंतर जर हे सर्व निर्दोष आहेत तर मग खून कुणी केला? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्याचेच उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मुलगा आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय डॉ. पद्मसिंह पाटलां विरूद्ध षडयंत्र रचणारी ती व्यक्ती कोण याची चर्चा सुरू झाली आहे. 
   
2006 साली पवनराजे निंबळाकर आणि  समद काझी यांची पनवेल जवळ कळंबोली इथं हत्या करण्यात आली होती. त्याला वीस वर्ष झाली. गेली सतरा वर्ष कायदेशीर प्रक्रीया सुरू होती. आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता. सतरा वर्षानंतर न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला आहे अशी पहिली प्रतिक्रिया डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह यांनी दिली आहे. पण ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं त्यांना ही 17 वर्ष परत कोण करणार असा प्रश्न त्यांनी केला आहे. पद्मसिंह पाटील यांना हे सर्व सहन करावं लागलं आहे. 

नक्की वाचा - Pavanraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

पद्मसिंह पाटील यांना राजकीय दुष्टीने अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं असा आरोप ही राण पाटील यांनी केला आहे. यातील सर्व गोष्टी टप्प्या टप्प्याने पुढे येतील असं ही ते म्हणाले. आम्हाला न्याय मिळाला त्याचे समाधान आहे. मात्र अशा वेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांना नेमकं काय झालं हे सांगू शकणार नाही. किंवा त्यांना सांगितलं तरी ही ते कळणार नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की  ही परिस्थिती का उद्भवली? हे षडयंत्र कुणी कशामुळे केलं? त्यात कोण कोण प्यादे होते? हे लवकरच समोर येईल. असं सांगत त्यांनी काही जुन्या गोष्टींचा आणि राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला आहे. त्यामुळे त्यांचा संशय नक्की कोणावर त्याची चर्चा होत आहे.

नक्की वाचा - Pavanraje Nimbalkar: 'माफीचा साक्षीदार फितूर', पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कोर्टाचं मोठे विधान

राण यांनी सांगितले की डॉ. पद्मसिंह पाटील 1990 च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते. त्यांना तसा शब्द दिला होता. पण त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. पुढे 2009 मध्ये ही तेच झाले. ते धाराशिव लोकसभेतून निवडून गेले होते. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. त्यांना कॅबिनेट मंत्री केले जाणार होते. पण त्याच वेळी काही लोकांनी पुढाकार घेतला. त्यांना मंत्री होवू दिले नाही. त्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं. असं राणाजगजित सिंह यांनी स्पष्ट पणे सांगितले. त्यावरून या षडयंत्रात कोण होते, त्यांचा रोख नक्की कुणाकडे होता याचे आंदाज बांधले जात आहेत. आता ते कोर्टाच्या माध्यमातून सर्वांच्या लक्षात आले आहे. कोर्टाची ऑर्डर मिळाल्यानंतर सर्व काही बोलेन असं ही ते म्हणाले.  

नक्की वाचा - Omraje Nimbalkar: पद्मसिंह पाटील निर्दोष, ओमराजेंचा युटर्न! पक्षांतरावर सर्वात मोठं विधान, 'निर्णय झाला नाही..

पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात षडयंत्र होतं हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र याबाबत आता काही बोलणार नाही. पक्षातले होते की नाही ते सांगणार नाही. मात्र या हत्येनंतर अनेक जण खोटं बोलत होते. त्याचं राजकारण करत होते. आता योग्य वेळी मी पुढच्या काळात बोलणार आहे असं राण पाटील यांनी सांगितलं. या प्रक्रीयेत कुणी वेळकाढू पणा काढत होता हे ही सांगणार आहे असं ते म्हणाले. हे फक्त धाराशिवचं राजकारण नव्हतं. हे महाराष्ट्राचं राजकारण होतं. खोलात गेलात तर तुम्हाला सर्व काही समजले असं ते म्हणाले. आता ही हत्या कुणी केली हे समोर आलं पाहीजे असं ही ते म्हणाले. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com