Beed News: पंकजा मुंडेंनी ताकद दाखवली, शरद पवारांच्या पॅनलचा उडवला धुव्वा

वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार राजाभाऊ फड यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बीड:

वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी बँकेच्या 17 ही जागेवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. विरोधी पक्षाच्या पॅनलला अनेक ठिकाणी खातं सुद्धा उघडता आले नाही. मतमोजणी अखेर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पॅनलने बाजी मारली. विजय खेचून आणल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. तब्बल 59 वर्षापासून वैद्यनाथ बँकेवर मुंडे घराण्याचे वर्चस्व  कायम आहे.

वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. एकूण 43 हजार 962 मतदारसंख्येपैकी 16 हजार 287 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी 37.5 इतकी नोंदवली गेली. नेहमीपेक्षा कमी मतदान झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. एकूण 17 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी चार जागा आधीच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने जिंकल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.

नक्की वाचा - Police Recruitment: मोठी पोलिस भरती, 'या' उमेदवारांना मिळणार विशेष सवलत, तर लेखी परिक्षा...

बँकेच्या 17 पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित 13 जागांसाठी मतदान झाले.  बँकेचे 43 हजार 962 हजार सदस्य मतदार आहेत. बीड जिल्ह्यात 67 मतदान केंद्र होते. बीड, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, जळगाव, नाशिक, मुंबई, पिपरी चिंचवड, सोलापूर जिल्ह्यात बूथ होते. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर सर्वसाधारण मतदार संघातून 12 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरले होते. तर निवडणुकीत महिला मतदार संघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदार संघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदार संघातून विनोद जगतकर हे बिनविरोध आले आहेत. 

नक्की वाचा - Cabinet Decision : रेशन दुकानदारांसाठी खूशखबर; मार्जिनच्या दरात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ

वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार राजाभाऊ फड यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ 1,407 मतांवर समाधान मानावे लागले असून, त्यांच्या विरोधातील उमेदवार रमेश कराड यांनी तब्बल 14,316 मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे पुन्हा एकदा बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटाने उमेदवार दिले होते. एकूण तीन उमेदवार रिंगणात उतरले होते, मात्र प्रमुख लढत राजाभाऊ फड आणि रमेश कराड यांच्यात होती. निकाल लागल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. रमेश कराड यांच्या प्रचंड विजयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement