लोकसभेत भारताच्या संविधानाची 75 वर्ष यावर चर्चा सुरू आहे. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपले विचार मांडले. संविधान हा आमचा आवाज आहे. संविधानाला वाचवण्यारे लोक हे इंडिया आघाडीत आहेत. संविधानाबाबत सावरकरांचे मत काय होतं? हे सांगत राहुल गांधी यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय द्रोणाचार्यांचं उदाहरण देत तिच मानसिकता आताच्या भाजपची आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जेव्हा संविधानाचा विषय येतो त्यावेळी आमच्या समोर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार येतात. त्यांचे विचार या संविधानात आहेत. हे विचार कुठू आले आहे असं सांगताना हे विचार भगवान शंकर, गुरु नानक, भगवान बासवन्ना, कबीर यांच्यापासून आले आहेत. आपल्या प्राचीन ठेव्यातून हे संविधान बनले आहे. त्या शिवाय ते पुर्ण होवू शकत नाही. इंडिया आघाडी त्यावर उभी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. सावरकरांनी आपल्या लेखामध्ये स्पष्ट लिहीलं आहे. संविधानात भारतीय असं काही नाही. त्याच सावरकरांची पुजा तुम्ही करता. त्यांचे जे मत आहे तेच मत भाजपच्या मित्रांचे आहे का? असा प्रश्न करत राहुल गांधी यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थिती तुम्ही सावरकरांनी सांगितलं आहे ते मानता की संविधानाला मानता असा प्रश्नही त्यांनी केला. आता तुम्ही संविधानाचं कौतूक करत आहात म्हणजेच तुम्ही आता सावकरांचा विरोध करत आहात असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीला हार्ट अटॅक! शाळेत खेळता खेळता मृत्यू; कुठे घडली घटना?
यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भारतात पुर्वी ज्या प्रमाणे चालायचा त्याच पद्धतीने तुम्ही तो चालवू पाहात आहात असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केली. यावेळी त्यांनी एकलव्याचे उदाहरण दिलं. एकलव्याला खालच्या जातीचा असल्याने द्रोणाचार्याने त्याला शिष्य केलं नाही. उलट त्याचा गुरूदक्षिणा म्हणून अंगठा कापून घेतला. तेस सध्याचे भाजप सरकार करत आहेत. त्यांनी देशातल्या युवकांचा, शेतकऱ्यांचा अंगठा कापला आहे. शेतकऱ्यांना अपमानीत केलं जात आहे. त्यांच्यावर लाठिचार्ज केला जात आहे असंही ते यावेळी म्हणाले.
हातरसमध्ये झालेल्या बलात्कार पिडीतेचे दुख ही यावेळी राहुल यांनी लोकसभेत मांडले. सरकार त्यांचे पुनर्वसन करणार नसेल तर इंडिया आघाडी त्यांचे पुनर्वसन करेल. उत्तर प्रदेशात सध्या संविधान नाही तर मनुस्मृती लागू आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. इंडिया आघाडी जाती जनगणना करण्याच्या पक्षात आहे. त्यामुळे ते केली जाईल. शिवाय आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवली जाईल असंही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world