जाहिरात

सावरकर आणि गोडसे यांच्यात रक्ताचं नातं, मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांचा नवा दावा! वाचा काय केले आरोप?

Rahul Gandhi on Savarkar : लोकसभातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकर संबंधित मानहानी प्रकरणात एक महत्त्वाचा दावा केला आहे.

सावरकर आणि गोडसे यांच्यात रक्ताचं नातं, मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांचा नवा दावा! वाचा काय केले आरोप?
मुंबई:

Rahul Gandhi on  Savarkar : लोकसभातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकर संबंधित मानहानी प्रकरणात एक महत्त्वाचा दावा केला आहे. या प्रकरणात तक्रारदार सत्यकी सावरकर यांचा संबंध महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या कुटुंबाशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पुण्याच्या विशेष  न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात राहुल गांधींनी आरोप केला आहे की, सत्यकी सावरकर हे नथुराम गोडसे यांचे धाकटे भाऊ गोपाळ विनायक गोडसे यांचे नातू आहेत. तक्रारदाराने जाणूनबुजून आणि पद्धतशीरपणे" आपल्या वंशावळीचा खुलासा केला नसल्याचा दावाही राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधींनी न्यायालयाला विनंती केली आहे की, तक्रारदाराला त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश द्यावेत.

राहुल गांधी यांनी याबाबत दाखल केलेल्या तक्रारीनुसार,  हे सत्य केवळ संबंधित नाही, तर या मानहानी खटल्याची दिशा आणि हेतू स्पष्ट करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. काँग्रेस खासदारांनी आपल्या अर्जात असेही म्हटले आहे की, तक्रारदाराची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि गोडसे कुटुंबाशी असलेले कथित संबंध या प्रकरणात हितसंबंधांच्या संघर्षाची शक्यता निर्माण करतात, जे न्यायालयासमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे.

( नक्की वाचा : तोंडाला काळे फासणार ! ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा राहुल गांधींना इशारा, काँग्रेस नेते संतापले )

राहुल गांधींचे वकील काय म्हणाले?

राहुल गांधी यांचे वकील मिलिंद शिंदे यांनी याबाबत 'NDTV मराठी' शी बोलताना सांगितलं की, या खटल्यातील फिर्यादी सत्यकी सावरकर यांनी खटला दाखल करताना मी विनायक दामोदर सावरकर यांचा पणतू आहे, असं फिर्यादीमध्ये म्हंटलं आहे. त्यांचा वंशज म्हणून त्यांनी ती तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी सावरकर कुटुंबीयांची पूर्ण वंशावळ कोर्टात दाखल केली. पण, त्यांनी त्यांची आई हिमानी सावरकर यांच्याकडची वंशावळ सादर केली नाही. सात्यकी सावरकर हे अशोक सावरकर आणि हिमानी सावरकर यांचे पूत्र आहेत. अशोक सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे आहेत. 

हिमानी सावरकर हे गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत. गोपाळ गोडसे हे नथुराम गोडसे यांचे सख्खे भाऊ आहेत. या दोघांनाही फाशी दिली गेली. गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये आरोपी होते. सावरकर त्यामधून निर्दोष सुटले. आम्ही हा अर्ज दाखल केलाय की सावरकरांचे वंशज म्हणून तुम्ही हा खटला दाखल करत असाल तर आईकडची वंशावळ देखील सादर करावी. सात्यकी सावरकर यांनी ही वंशावळ न्यायालयात दाखल करावी. त्यांनी दाखल केली नाही तर विश्रामबाग पोलिसांनी तपास करुन ती दाखल करावी, अशी मागणी आम्ही न्यायालयात केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com