पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं. मोदींनी यावेळी त्यांच्या 10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड सभागृहापुढे मांडला. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी काँग्रेस पक्ष, INDIA आघाडी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला केला. लोकसभा निवडणुकीत एक पक्ष 99 वरच थांबला आणि आता मुलाचं मन रमवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या हल्ल्यातील 5 प्रमुख मुद्दे
1. लोकसभेनं बालिश चाळे पाहिले
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले, 'आजकाल सहानुभूती मिळवण्यासाठी नवी ड्रामेबाजी सुरु झाली आहे. नवे खेळ खेळले जात आहेत. एक किस्सा सांगतो. एक मुलगा शाळेतून घरी आला आणि जोरात रडू लागला. त्याची आई घाबरली. मला शाळेत मारलं असं त्यानं आईला सांगितलं. आईनं कारण विचारलं तर ते त्यानं सांगितलं नाही. त्या मुलानं एका मुलाला आईवर शिवी दिली होते. हे त्यानं सांगितलं नाही. त्याची पुस्तकं फाडली होती. शिक्षकांना चोर म्हंटलं होतं. कुणाचा डबा चोरुन खाल्ला होता. आपण संसदेमध्येही हे बालिश चाळे पाहिले आहेत. काल इथं विलाप सुरु होता.'
2. काँग्रेसनं शोले सिनेमाला मागं टाकलं
राहुल गांधींचं नाव न घेता पंतप्रधान मोदींनी सांगितलं, 'काँग्रेस नेत्यांनी आणि त्यांच्या वक्तव्यांनी शोले सिनेमालाही मागं टाकलं आहे. ते लोक सांगत आहेत - तिसऱ्यांदा तर हरलो आहोत. अरे मौसी, 13 राज्यांमध्ये 0 जागा मिळाल्या आहेत. पण, हिरो तरी आहे ना. अरे मौसी, पक्षाची नाव बुडाली आहे. पण पक्षाचा श्वास तरी सुरु आहे. मी सांगतो खोट्या विजयाचं सेलिब्रेशन करु नका. देशानं दिलेल्या जनादेशाचा अर्थ प्रामाणिकपणे समजण्याचा प्रयत्न करा. त्याचा स्विकार करा.'
भाषण सुरु असतानाच बसले मोदी, राहुल गांधींवर भडकले अध्यक्ष! नेमकं काय झालं?
3. काँग्रेस परजीवी पार्टी झाली आहे
पंतप्रधान मोदींनी सांगितलं, 'ही निवडणूक काँग्रेसच्या सहकाऱ्यांसाठीही एक संदेश आहे. आता काँग्रेस पक्ष 2024 पासून परजीवी काँग्रेस म्हणून ओळखला जाईल. 2024 मधील काँग्रेस ही परजीवी काँग्रेस आहे. जो परजीवी असतो तो कुणाच्या तरी शरीराच्या आधारावर जगतो आणि त्यालाच खातो. काँग्रेस ज्या पक्षाशी आघाडी करतं त्याचीच मतं खात आहे. सहकारी पक्षाच्या जीवावर त्याचं पोषण होत आहे. त्यामुळे काँग्रेस आता परजीवी पक्ष बनला आहे.
4. मुलाचं मन रमवण्याचा प्रयत्न
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात राहुल गांधींवर जोरदार हल्ला केला. त्यांनी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, 'एक लहान मुलगा सायकल घेऊन निघाला. तो पडला. त्यानंतर रडू लागला. त्यावर मोठे येऊन म्हणतात ते पाहा मुंगी मेली... असं सांगून मुलाचं मन रमवण्यात येतं. सध्या मुलाचं मन रमवण्याचंच काम सुरु आहे.'
'काही लोकांचा त्रास समजू शकतो', PM मोदींचा विरोधकांवर प्रहार
5. काँग्रेसला 543 पैकी 99 जागा
काँग्रेसवर टीका करताना मोदींनी दुसरा किस्सा सांगितला. पंतप्रधान म्हणाले, '1984 पासून आत्तापर्यंत 10 लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. तेंव्हापासून काँग्रेसला 250 चा आकडा गाठता आलेला नाही. यंदा ते 99 वर अडकले आहेत. मला एक गोष्ट आठवते. एक मुलगा 99 टक्के मार्क्स घेऊन फिरत होता. लोकांकडून कौतुक करत होता. शिक्षकांनी सांगितलं की, याला 100 पैकी 99 मिळालेले नाहीत. 543 पैकी 99 मिळाले आहेत.