Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार? 'त्या' एका बॅनरमुळे राजकीय उलथापालथ होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाराज कार्यकर्त्यांच्या रूपाने मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात पक्षातील मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून वरिष्ठ नेत्यांविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं समजते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune NCP Latest News Update
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune NCP latest News Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाराज कार्यकर्त्यांच्या रूपाने मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात पक्षातील मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून वरिष्ठ नेत्यांविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.पुण्यात या नाराज कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.विशेष म्हणजे,बैठकीत लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर फक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,अजित पवार आणि पार्थ पवार यांचेच फोटो होते.इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा, अगदी प्रदेशाध्यक्षांचाही फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

“आम्ही फक्त सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाच आमचे नेते मानतो.”,असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत वरिष्ठ नेत्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच,“ठराविक मर्जीतील नेत्यांनाच संधी आणि बळ दिले जाते,मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते,”अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली.

Advertisement

नक्की वाचा >> Mumbai News : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात चोरी, CCTV तपासताच समोर आली खळबळजनक माहिती

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उदय आहेर काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कोणत्याही नेत्याने आवाज उठवला नाही.फक्त अमोल मिटकरी यांनी भूमिका मांडली,असा आरोप करण्यात आला.“अजित पवार यांच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यता आहे का?” असा सवालही काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.“आमचा राजकीय आधारच हरपला आहे.आमच्याकडे लक्ष देणारा कोणीच उरलेला नाही.

नक्की वाचा >> Inside Story: 15 भाषांचं ज्ञान, 200 कोटींचं साम्राज्य अन् महिलांचं लैंगिक शोषण, वाचा अशोक खरातची A To Z कुंडली

त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहोत,”अशी प्रतिक्रिया उदय आहेर यांनी दिली आहे.दरम्यान, रुपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा घेतला गेला,मात्र पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा का घेतला नाही? त्यांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे.हे सर्वांना माहिती आहे,असेही कार्यकर्त्यांनी म्हटले.