जाहिरात

Mumbai News : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात चोरी, CCTV तपासताच समोर आली खळबळजनक माहिती

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिता चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai News : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात चोरी, CCTV तपासताच समोर आली खळबळजनक माहिती
Mumbai Siddhivinayak Temple Robbery
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी 

Mumbai Crime News Today : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिता चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सिद्धीविनायक मंदिर पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून 10 हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर आलीय. मागील 8 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सत्य समोर आलं. येथील कामगारच चोरी करत असल्याची माहिती या सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात चोरीच्या घटना घडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बोटाच्या कैचीने पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून कर्मचारी पैसे काढायचा. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने चोरट्याचा पर्दाफाश झाला. दरम्यान, आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीचं नाव जाहीर केलं नाहीय. 

नक्की वाचा >> Inside Story: 15 भाषांचं ज्ञान, 200 कोटींचं साम्राज्य अन् महिलांचं लैंगिक शोषण, वाचा अशोक खरातची A To Z कुंडली

पोलिसांकडून चोरीच्या घटनेचा कसून तपास सुरु 

दरम्यान, कर्मचाऱ्याने गुन्हा कबूल केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  कर्मचारी याआधी देखील पैसे काढत होता का? त्याने पैसे काढले असतील तर त्याच्याकडे चोरीच्या पैशांची किती रक्कम जमा आहे? या चोरीच्या घटनेत आणखी कोणी सामील आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात चहाच्या टपरीवर सर्वात भयंकर घटना, पोलिसांनी 6 तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com