
महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून खटके उडत असताना दिसत आहे. कधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी तर कधी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे चित्र आहे. स्थानिक पातळीवर ही वाद होताना दिसत आहेत. अशा वेळी अमरावतीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारा विरुद्ध हत्यार उपसले आहेत. अमरावती महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत राणा विरुद्ध खोडके असा वाद उफाळला आहे. त्यातून आमदार रवी राणा आणि आमदार संजय खोडके यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रवी राणा यांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एवढी गुर्मी व दादागिरी खोडे यांनी करु नये असा थेट इशाराच आमदार रवी राणा यांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा व राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला आहे. लोकसभेमध्ये संजय खोडके यांनी महायुतीच्या विरोधात काम केलं. तर विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवारांचे आपल्याला 50 फोन आले. खोडकेंना मदत करा असं अजित पवारांनी सांगितलं असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
राणा पुढे म्हणाले की, मी थोडं तरी त्यांचं ऐकलं नसतं तर खोडके यांचा कमीत कमी दहा हजार मतांनी पराभव झाला असता असं ही रवी राणा म्हणाले. त्यामुळे त्यांनी एवढी गूर्मी करू नये. दादागिरी तर अजिबात करू नये असा इशाराही रवी राणा यांनी दिला आहे. तीन तीन वेळा त्यांना पाडलं आहे. तरी पण त्यांच्यात सुधारणा झाली नाही. ते नेहमी अहंकारात राहातात. त्यांचा अहंकार जनतेने चूर चूर केला आहे. असं ही रवी राणा यावेळी म्हणाले.
रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खडके यांनी ही पलटवार केला आहे. रवी राणा मला नेहमीच धमकी देतात. निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की तीन वेळा पाडलं. पण भरोशावर निवडून येत असतो. त्यावेळी जनतेने मला नाकारलं याची मलाही काही खंत नाही. असं खोडके म्हणाले. रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की ते मला पाडू शकतात असं ही खोडके म्हणाले. अजित दादांनी एकही फोन रवी राणाला केला नाही. उलट नवनीत राणा यांच्या प्रचाराला अमरावतीत अजित पवार आले होते. तेव्हा रवी राणा यांनी म्हटलं की खोडकेंना स्टेजवर बोलवा असा प्रसंगही त्यांनी सांगितला. विधानसभा निवडणुकीत मला रवी राणा यांना सोबत घेऊन माझी मतं खराब करायचे नव्हते. रवी राणा जाच्यासोबत जाईल त्याचे मत खराब होतं असं ही खोडके म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world