'मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पहिले बळी शरद पवार' असं कोण म्हणालं?

प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षण बचाव यात्रा काढली होती. त्यात त्यांनी ओबीसींची बाजू घेत त्यांच्या आरक्षणाला हात लावता येणार नाही असे सांगितले होते.

Advertisement
Read Time: 2 mins
सांगली:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे पहिले बळी हे शरद पवार आहेत. असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याला शरद पवारांनी पाठींबा दिला. त्यामुळे शरद पवार हे आता मराठ्यांचे नेते झाले आहेत,अशी भावना ओबीसी नेत्यांची झाली आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशा पद्धतीने जरांगेंच्या आंदोलनाचे पहिले बळी हे शरद पवार ठरले आहेत असा तर्क आंबेडकर यांनी लावला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगेच्या आंदोलनाचा पहिले बळी शरद पवार ठरले, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला शरद पवारांनी रत्नागिरीमध्य समर्थन दिले होते. यामुळे आता शरद पवार हे मराठ्यांचे नेते झालेत. अशी भावना ओबीसी नेत्यांची झाली आहे. त्यामुळे शरद पवार हे आता सार्वत्रिक नेते न राहता मराठ्यांचे नेते बनले आहेत, असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 

ट्रेंडिंग बातमी - अमित शहांचेही कापले होते तिकीट, त्यावेळचा किस्सा काय? अमित शहांनी स्वत: सांगितलं

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टिका केली. जरांगे-पाटलांच्या आत्ताच्या भूमिकेमुळे गरीब मराठा समाजाला न्याय मिळणार नाही,असे ही आंबेडकर मिळाले. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. ती मागणी रास्त नाही अशी भूमीका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.  एकीकडे आरक्षणाच्या मुद्यावरून भूमिका स्पष्ट न करून काँग्रेस ओबीसींना धोका देत आहे. तर दुसरीकडे महायुती सरकार ओबीसींच्या हक्काचा निधी ओबीसींच्या कल्याणासाठी न वापरता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणजेच काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष ओबीसींना धोका देत आले आहेत असा आरोप आंबेडकर यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - 'मी विधानसभेत दिसणार' निलेश राणेंच्या घोषणेनं कोणाचा पत्ता कट होणार?

त्यामुळे आता ओबीसींनी सावध राहून आगामी विधानसभेत आपल्या हिताची भूमीका घेणारा पक्ष कोणता आहे, हे ओळखले पाहीजे. शिवाय आपल्या हक्काच्या आड येणारे पक्ष कोणते आहेत हे लक्षात ठेऊन त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहनही आंबेडकरांनी केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षण बचाव यात्रा काढली होती. त्यात त्यांनी ओबीसींची बाजू घेत त्यांच्या आरक्षणाला हात लावता येणार नाही असे सांगितले होते.