जाहिरात

Mudhoji Raje:'कोरटकर देशद्रोही, त्याला जामीन मिळू नये', मुख्यमंत्र्यांच्या होमपिचवर वातावरण तापलं

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलून त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणाऱ्या प्रशांत कोरटकर याला देशद्रोहाची शिक्षा देण्यात यावी असं ही राजे यापत्रात म्हणतात.

Mudhoji Raje:'कोरटकर देशद्रोही, त्याला जामीन मिळू नये', मुख्यमंत्र्यांच्या होमपिचवर वातावरण तापलं
नागपूर:

प्रशांत कोरटकर याला जामीन मिळू नये, मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी विद्वान वकिलांना नेमून न्यायालयात मजबुतीने बाजू मांडण्यात यावी, कोरटकर याला देशद्रोहाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागपूरचे मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीले आहे. शिवाय त्याला सहकार्य करणाऱ्यांची चौकशी केली जावी. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा हवा, असंही त्यांनी या पत्रात सांगितलं. अशा लोकांची संपत्ती जप्त करून सरकारजमा करण्यात यावी असं ही ते म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरकार शिवभक्तांचे आहे, मग जी तत्परता संतोष देशमुख प्रकरणात ती तत्परता प्रशांत कोरटकर प्रकरणात दाखवावी अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापुरात दाखल गुन्ह्यात कोरटकरला अंतरीम जामीन मिळाला आहे. त्या जामिनावर 11 मार्चला सुनावणी पार पडणार आहे. त्या सुनावणी दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी आपली बाजू भक्कम पणे मांडावी. तसेच  गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कस्टडीची मागणी करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)

याकरिता विद्वान सरकारी वकीलची टीम सरकारने द्यावी. नागपूर, जालना व इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून सरकार व पोलीस प्रशासनाने भूमिका बजवावी असं राजेंनी म्हटलं आहे. कोल्हापूर येथून मिळालेल्या जामिना नंतर नागपूर व इतर गुन्ह्यात त्याला जामीन मिळणार नाही. याची काळजी सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे. 

(नक्की वाचा- विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून नाव निश्चित, आदित्य नाही तर 'या' नेत्यावर शिक्कामोर्तब)

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलून त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणाऱ्या प्रशांत कोरटकर याला देशद्रोहाची शिक्षा देण्यात यावी असं ही राजे यापत्रात म्हणतात. कोणत्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह व अपमानजनक शब्द वापरून जाती जातीत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या समाज विघातक व्यक्तींवर देशद्रोह, राजद्रोहाचा अजामिन पात्र गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची सर्व संपत्ती सरकार जमा करावी, अशी कायद्यात तरतूद असावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातमी -  रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? CM फडणवीसांच्या प्रतिक्रियेने राजकारणात खळबळ; म्हणाले...

कोरटकरला फरार होण्यास सहकार्य करणाऱ्या व त्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात असलेल्या लोकांचा तपास करून चौकशी करावी. असं या पत्रात म्हटलं आहे.  या गंभीर प्रकरणात कोरटकरवर कारवाईसाठी सरकार पोलीस प्रशासन व इतर प्रशासनाची भूमिका सकारात्मक असावी असं फडणवीसांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.