जाहिरात

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींचा चिरंजीव रेहानने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, वाड्रांची होणारी सून कोण आहे?

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचा सुपूत्र रेहान वाड्रा याचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. ७ वर्षांची मैत्री आता एका नाजूक बंधनात अडकली आहे.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींचा चिरंजीव रेहानने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, वाड्रांची होणारी सून कोण आहे?
रेहान और अवीवा वेग
  • प्रियंका गांधी के बेटे रेहना वाड्रा ने अपनी गर्लफ्रेंड अवीवा बेग के साथ सगाई की
  • सगाई की खबर को काफी निजी रखा गया था और इसकी जानकारी केवल कुछ बेहद करीबियों को थी
  • दोनों परिवार मिलकर अब शादी की तारीख तय करेंगे, अवीवा को फोटग्रॉफी का शौक है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Who is aviva begh : काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचा सुपूत्र रेहान वाड्रा याचा साखरपुडा नुकताच पार पडला. ७ वर्षांची मैत्री आता एका नाजूक बंधनात अडकली आहे. रेहान वाड्राच्या साखरपुड्याच्या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याने आपली जुनी मैत्रिण अवीवा बेग हिच्यासोबत साखरपुडा केल्याचं वृत्त आहे. बेग ही दिल्लीची राहणारी असून रेहान प्रमाणे तीदेखील फोटोग्राफर आहे. दोन्ही कुटुंबाने हा कार्यक्रम अत्यंत वैयक्तिक ठेवला. खूप कमी जणांना याबाबत माहिती होती.

प्रियंका गांधी याचा मुलगा रेहान याने त्याची खास मैत्रिण अवीवा बेगसोबत साखरपुडा केल्याचं वृत्त कुटुंबातील उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळालं आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रेहान वाड्राने नुकतच सात वर्षापासून नात्यात असलेल्या गर्लफ्रेंड अवीवा बेगला प्रपोज केलं आणि तिने त्याला होकार दिला आहे. दोन्ही कुटुंबीयांनीही या नात्याचा स्वीकार केला आहे. अवीवा बेग आणि तिचं कुटुंबीय दिल्लीचं राहणारं आहे. 

अवीवा बेग

अवीवा बेग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंब मिळून लग्नाची तारीख ठरवतील. प्रियंका गांधी या केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत. वाडनाडमध्ये झालेल्या उपनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी झाल्या. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा व्यावसायिक आहेत. 

रेहान राजकारणापासून दूर...

रेहान अनेकदा प्रियंका गांधींसोबत दिसतो. मात्र राजकारणापासून तो राहिला आहे. रेहानने डॉर्क परसेप्शन नावाचं सोलो एक्झिबिशन केलं आहे. कोलकातात त्याच्या फोटोग्राफीचं प्रदर्शनही लागलं होतं. रेहान व्हिज्युअल आर्टिस्ट आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com