जाहिरात

Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवारांच्या कंपनीला जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी इतके कोटी रुपये भरावे लागणार

Parth Pawar Pune Land Scam: पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या कंपनीला किती कोटी रुपये भरावे लागणार आहेत?

Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवारांच्या कंपनीला जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी इतके कोटी रुपये भरावे लागणार
"Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवारांच्या कंपनीला करार रद्द करण्यासाठी भरावे लागतील इतके कोटी रुपये"
IANS English

Parth Pawar Pune Land Scam: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या कंपनीतर्फे करण्यात आलेला संपूर्ण व्यवहार रद्द करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यानंतर अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीला आता व्यवहार रद्द करण्यासाठी दुप्पट मुद्रांक शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती समोर आलीय. यानुसार पार्थ पवार यांच्या कंपनीला तब्बल 42 कोटी रुपये (Rs 42 crore) भरावे लागणार आहेत.

किती टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार?

नोंदणी आणि मुद्रांक विभागाने पार्थ पवार यांचे चुलत भाऊ आणि अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांना सांगितलंय की, "कंपनीला आधीचे सात टक्के मुद्रांक शुल्क (महाराष्ट्र मुद्रांक कायद्यांतर्गत पाच टक्के, एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो उपकर) भरावे लागेल. कारण त्यांनी जमिनीवर डेटा सेंटर प्रस्तावित असल्याचा दावा करून सूट मागितली होती."

व्यवहार रद्द करण्यासाठी कंपनीला सात टक्के अतिरिक्त मुद्रांक शुल्क देखील भरावे लागेल, असेही विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. विभागाच्या माहितीनुसार, भूखंडावर डेटा सेंटर उभारले जाईल, असे सांगत संबंधित कंपनीने विक्री कराराच्या वेळेस मुद्रांक शुल्कामध्ये सूट मागितली होती, पण आता सादर करण्यात आलेल्या व्यवहार रद्द करारावरुन ही योजना रद्द करण्यात आल्याचं दिसून आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया | CM Devendra Fadnavis Comment On Pune Land Scam

दुसरीकडे FIRमध्ये पार्थ पवार यांचे नाव नसल्याबाबत CM फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) यांना विचारले असता ते म्हणाले की, जमीन खरेदी व्यवहारामध्ये ज्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या, त्या संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि कोणाला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांना एफआयआर म्हणजे काय हे देखील समजत नाही ते निराधार आरोप करत आहेत.  

Pune Land Scam : 'हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय...' पार्थ पवार प्रकरणातील आरोपीवर शरद पवारांची गूढ प्रतिक्रिया

(नक्की वाचा: Pune Land Scam : 'हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय...' पार्थ पवार प्रकरणातील आरोपीवर शरद पवारांची गूढ प्रतिक्रिया)

राशप अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले? | Sharad Pawar | Parth Pawar Case Updates

तर हे प्रकरण गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चौकशी करून त्याबाबतचे वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (राशप) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलीय. 

पुणे भूखंड घोटाळा, नेमके काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असणारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील जवळपास 40 एकर जमिनीची पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली. या खरेदी व्यवहारात शासनाची 152 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे म्हटलं जातंय. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आलंय.  

(Content Source PTI Bhasha)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com