जाहिरात

Pune News: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये, मोठा निर्णय होणार?

या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी जय पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास काय रणनिती असेल त्याची आखणीच ते करणार आहेत.

Pune News: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये, मोठा निर्णय होणार?
  • बारामती विधानसभेची पोटनिवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतर होत आहे
  • जय पवार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत
  • सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असून विरोधकांचा उमेदवार कोण असा प्रश्न आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

देवा राखुंडे 

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे अजून ही स्पष्ट नाही. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमीका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी आता जय पवार हे या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात वेगवेगळी चर्चा रंगलेली दिसत आहे. सुनेत्रा पवार या ही पोटनिवडणूक लढवणार आहेत हे स्पष्ट आहे.  त्यांच्या विरोधात कोण याचीच सर्वांना प्रतिक्षा आहे.   

पोटनिवडणूक होत असताना बारामतीत उद्या म्हणजे शनिवारी जय पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार आहेत. संध्याकाळी चार वाजता बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. बारामती तालुका आणि शहर कार्यकारणीसह विविध सेलच्या  पदाधिकाऱ्यांची जय पवार आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत ते पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. 

नक्की वाचा - Pune News: न्याय द्या, नाहीतर जीव घ्या! 75 वर्षांची आजी 73 दिवसांपासून बसलीये उपोषणाला, 'हे' आहे कारण

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात कितपत यश येतं याबाबत शंका आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने ही जागा लढण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला विरोध म्हणून ही निवडणूक लढणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. अशा वेळी मविआमध्ये असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमीका काय असणार हे महत्वाचे आहे. काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरला तर त्याला राशप मदत करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - Success Story: परंपरा जपली अन् स्वप्नही गाठलं! 7 वर्षे पदराआड राहून अभ्यास केला, थेट जज झाल्या, आता लोक...

या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी जय पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास काय रणनिती असेल त्याची आखणीच ते करणार आहेत. त्यासाठी ते तयारीला लागले आहे. पार्थ पवार यांच्यावर एकीकडे महत्वाची जबाबदारी दिली असताना आता जय पवारांवर ही मोठी जबाबदारी दिली आहे. अशा वेळी जय पवार काय रणनिती आखतात याबाबत उत्सुकता आहे. निवडणूक झाली तर काय आणि ती बिनविरोध व्हावी यासाठी काय करावे याबाबत ते सध्या विचार करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com