लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत जावून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोमनाथ सुर्यवंशी हे दलित होते. ते संविधानाचे संरक्षण करत होते. त्यामुळेच त्यांचा खून करण्यात आला. हा शंभर टक्के खून आहे. पोलिस कोठडीत झालेला खून आहे. असं म्हणताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या हत्ये प्रकरणी मुख्यमंत्री हे विधानसभे खोटं बोललं असं वक्तव्य राहुल गांधी यांनी यावेळी केले. त्या आधी त्यांनी सुर्यवंशी कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संविधानाची विटंबन झाल्यानंतर परभणीत लोक रस्त्यावर उतरले होते. निदर्शने झाली होती. त्यानंतर त्याला हिंसक वळण लागले होते. त्या वेळी सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी चळवळीतील तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर चार दिवसांनी त्याचा ह्रदय विकाराने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळवलं होतं. मात्र सोमनाथची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यांच्या अंगावर जखमा ही होत्या असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं. शिवाय त्यांना कोणताही आजार नव्हता असंही स्पष्ट केलं होतं.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. मी सोमनाथ सुर्यवंशी यांचा शवविच्छेदन रिपोर्ट पाहिला आहे. व्हिडीओ ही पाहीले आहेत. कुटुंबीयांनी फोटोग्राफही दाखवले. त्यामुळे हा शंभर टक्के पोलिस कोठडीत झालेला खून आहे. ही हत्या पोलिसांनी केली आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. त्यानंतर मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले. असंही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने वाद पेटण्याची दाट शक्यत आहे.
सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाला का मारलं? तर तो केवळ दलित आहेत. तो संविधानाची रक्षा करत होता. तो आपल्या विचारसरणीसाठी लढत होता. त्यामुळेच त्याचा खून केला गेला असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहीजे. त्याची आम्ही मागणी करत आहोत असंही राहुल गांधी म्हणाले. जे काही सरकारकडून सांगण्यात आलं त्याबाबत आपण संतुष्ट नाही. ही एक हत्या आहे. यात कोणी राजकारण करत नाही. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहीजे असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world