जाहिरात

Dhurandhar: धुरंधरचा निर्माता नक्की कोण? का होतेय राहुल गांधींची चर्चा? चर्चे मागचं सत्य आलं समोर

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट 2000 च्या दशकाच्या अखेरीस घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे.

Dhurandhar: धुरंधरचा निर्माता नक्की कोण? का होतेय राहुल गांधींची चर्चा? चर्चे मागचं सत्य आलं समोर
  • धुरंधर हा रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनीत स्पाय थ्रिलर चित्रपट आहे
  • चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
  • सोशल मीडियावर चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर बाबत अफवा पसरली आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांची 'धुरंधर' (Dhurandhar) या स्पाय थ्रिलर चित्रपटाने मोठी धूम माजवली आहे. 5 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या यशादरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी वेगाने पसरली की, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या सुरूवातीला निर्माता म्हणून राहुल गांधी हे नाव येते. त्यामुळे हा प्रश्न पडला आहे. त्यामागचे सत्या आता समोर आले आहे. 

अफवेचे मूळ काय?
चित्रपटाचे 'एन्ड क्रेडिट्स' (End Credits) पाहिले असता, 'एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर' (Executive Producer) म्हणून 'राहुल गांधी' यांचे नाव दिसून आले. हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी, "राहुल गांधी आता चित्रपट बनवायला लागले?" असे विचारले, तर काहींनी "हे तेच राहुल गांधी आहेत की दुसरे कोणी?" असे प्रश्न विचारले.

नक्की वाचा - Dhurandhar: 'धुरंधर'चा पाकिस्तानने घेतला धसका! बॉलिवूडला प्रत्युत्तर देण्यासाठी उचललं मोठं पाऊल

'धुरंधर'चे राहुल गांधी कोण आहेत?
फॅक्ट चेक (Fact Check) केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये असलेले 'राहुल गांधी' हे काँग्रेस नेते नसून, ते त्यांचे नामसाधर्म्य (Namesake) आहेत. हे राहुल गांधी चित्रपटसृष्टीत आधीपासूनच सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी अक्षय कुमारचा 'रुस्तम' (Rustom), वेब सिरीज 'द फॅमिली मॅन' (The Family Man), 'रॉकेट बॉईज' (Rocket Boys), 'ब्लर' (Blur) आणि 'लकी भास्कर' (Lucky Bhaskar) अशा अनेक प्रोजेक्ट्सना सपोर्ट केला आहे. राजकीय नेते राहुल गांधी यांचा या 'धुरंधर' चित्रपटाशी कोणताही संबंध नाही.

नक्की वाचा - Amitabh Rekha: अमिताभ-रेखा यांच्या नात्याचं अखेर कोडं उलगडलं, जवळच्या मैत्रीणीनं सत्य समोर आणलं

'धुरंधर' चित्रपटाची कथा
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट 2000 च्या दशकाच्या अखेरीस घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट भारताचे 'काउंटर-टेररिझम ऑपरेशन' (Counter-Terrorism Operations) दाखवतो. रणवीर सिंगने यात 'हमजा' नावाच्या भारतीय एजंटची भूमिका केली आहे. जो पाकिस्तानमधील गँगस्टर 'रहमान डकैत' (अक्षय खन्ना) याच्या नेटवर्कमध्ये प्रवेश करतो. संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर माधवन यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'जियो स्टुडिओज' आणि 'बी62 स्टुडिओज'च्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com