जाहिरात

Rahul Gandhi : चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या बैठकीत चक्क राहुल गांधींना मिळाली शिक्षा, काय आहे कारण?

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मध्य प्रदेशमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित एका प्रशिक्षण सत्रात उशीर होणे चांगलेच महागात पडले.

Rahul Gandhi : चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या बैठकीत चक्क राहुल गांधींना मिळाली शिक्षा, काय आहे कारण?
Rahul Gandhi : काँग्रेसच्या बैठकीत चक्क राहुल गांधींना शिक्षा झाली.
मुंबई:

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मध्य प्रदेशमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित एका प्रशिक्षण सत्रात उशीर होणे चांगलेच महागात पडले. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना चक्क 10 पुश-अप्सची (Push-ups) शिक्षा झाली! लोकसभा विरोधी पक्षनेते असलेल्या गांधींनीही विलंब न लावता ही शिक्षा मान्य केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, प्रशिक्षण सत्रात उशिरा पोहोचलेल्या इतर जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनाही ही शिक्षा पूर्ण करावी लागली. 

नेमकं काय घडलं?

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुश-अप्सचा किस्सा मध्य प्रदेशातील पंचमढी येथे 'संघटन सृजन अभियान' या कार्यक्रमादरम्यान घडला. पक्षाच्या संघटनात्मक स्तराला पुन्हा सक्रिय करण्यासाठी हे अभियान आयोजित करण्यात आले होते. बिहारमधील निवडणुकीच्या अत्यंत व्यस्त प्रचारातून वेळ काढून राहुल गांधी या मध्य प्रदेशातील पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले होते. यातील एका सत्रात त्यांना पोहोचायला थोडा उशीर झाला.

प्रशिक्षणाचे प्रमुख असलेले सचिन राव (Sachin Rao) यांनी तेव्हा राहुल गांधींना सांगितले की, उशिरा येणाऱ्यांवर "दंडात्मक कारवाई (penal action)" करणे आवश्यक आहे. तेव्हा 'तुम्हाला काय करायला आवडेल?' असे गांधींनी विचारले. यावर राव यांनी हसत हसत उत्तर दिले, "कमीतकमी 10 पुश-अप्स!"

( नक्की वाचा : Pune Land Scam : 'हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय...' पार्थ पवार प्रकरणातील आरोपीवर शरद पवारांची गूढ प्रतिक्रिया )
 

पांढऱ्या टी-शर्ट आणि पँटमध्ये असलेल्या राहुल गांधींनी क्षणाचाही विलंब न लावता ही शिक्षा लगेच पूर्ण केली. त्यानंतर उशिरा आलेल्या जिल्हाध्यक्षांनीही त्यांचे अनुकरण केले. सचिन राव यांच्या हलक्या-फुलक्या टिप्पणीमुळे एका संघटनेच्या बैठकीचे रूपांतर टीम-बिल्डिंग व्यायामात झाले. "जिल्हाध्यक्षांकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला," असे गांधींनी नंतर स्पष्ट केले.

Latest and Breaking News on NDTV

 राहुल गांधींचे गंभीर आरोप

पंचमढीमध्ये राहुल गांधींनी सत्ताधारी भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) पुन्हा एकदा निशाणा साधला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. मध्य प्रदेशच्या निवडणुकीतही असेच गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. "काही दिवसांपूर्वीच मी हरियाणा मॉडेल सादर केले, जिथे 25 लाख मतं चोरीला गेली – म्हणजे प्रत्येक आठ मतदारांमागे एक मत. ही त्यांची पद्धत आहे. 'व्होट चोरी' (Vote chori) हा मुख्य मुद्दा आहे. आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही ते एक-एक करून जाहीर करू," असे ते म्हणाले. मात्र, भाजपने आणि निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

( नक्की वाचा : Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब' वाली 'ब्राझिलियन मॉडेल' समोर! Viral फोटोवर केला मोठा खुलासा )
 

भाजपानं लगावला टोला

दरम्यान, भाजपने राहुल गांधींना 'सुट्ट्यांवर' असल्याबद्दल टोमणा मारला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) यांनी 'X' (पूर्वीचे Twitter) वर पोस्ट करत म्हटले आहे:

"राहुल गांधींसाठी LoP म्हणजे Leader of Paryatan (पर्यटन) and partying आहे. बिहारमध्ये निवडणुका सुरू असतानाही, राहुल गांधी सुट्टीसाठी जातात. निवडणूक बिहारमध्ये आणि राहुल गांधी पंचमढीमध्ये 'जंगल सफारी'चा आनंद घेत आहेत."

पूनावाला पुढे म्हणाले, "ते निवडणुका हरतात, तेव्हा ते ECI वर दोषारोप करतात आणि 'H Files' (holiday files) वर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन (PowerPoint presentation) बनवतात. ता उम्र काँग्रेस ये गलती करती रही, धूल चेहरे पे थी काँग्रेस आईना साफ करती रही (काँग्रेसने आयुष्यभर हीच चूक केली, चेहऱ्यावर धूळ होती आणि काँग्रेस आरसा साफ करत राहिली)," असे म्हणत त्यांनी गालिब यांच्या शेरामध्ये बदल करून काँग्रेसवर निशाणा साधला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com