जाहिरात

"सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण"; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काँग्रेसच्या दुटप्पी धोरणावर आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सोयीनुसार रंग बदलणे म्हणजे काँग्रेसचे राजकारण!" अशा शब्दांत टीका करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोलकाता येथील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला.

"सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण"; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

काँग्रेसचे 'इंडिया' आघाडीतील धोरण आणि विरोधी पक्षांचे 'व्होट चोरी'चे आरोप यावरून भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेस पक्षावर आणि राहुल गांधींवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ बैठकीतील भाषणाचा व्हिडिओ शेअर करत चव्हाण यांनी काँग्रेसच्या अपयशावर आणि दुटप्पी राजकारणावर बोट ठेवले. 'चोराच्या उलट्या बोंबा' म्हणत त्यांनी राहुल गांधी ज्या राज्यांमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बनवू शकले नाहीत, तिथे मित्रपक्षांचे काय चालले आहे यावर गप्प का आहेत, असा थेट सवाल उपस्थित केला.

रविंद्र चव्हाण यांची सोशल मीडिया पोस्ट 

रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण! ज्या राज्यांमध्ये तब्बल 40-40 वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे त्यांच्याच मित्रपक्षांची सत्ता होती. व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते याबद्दल तोंडातून ‘ब्र' देखील काढणार नाहीत. ‘चोराच्या उलट्या बोंबा' म्हणतात ते हेच!"

अमित शाह यांच्या कोलकाता भाषणातील मुख्य मुद्दे

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशभरातील विविध राज्यांमध्ये किती वर्षांपासून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही, याचा पाढा वाचला. ते म्हणाले की, 'काँग्रेसने या पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी नेते झाल्यापासून देशातील नागरिक वेळोवेळी त्यांच्याविरोधात कौल देत आहेत आणि राहुलजींच्या नेतृत्वात 'इंडिया आघाडी' पुन्हा मोडण्यास सुरुवात झाली आहे.'

काँग्रेसच्या या अपयशावर बोट ठेवताना, रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा भाजपची भूमिका ठामपणे मांडली आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com