Shivsena News: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय ठरलं होतं? सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, महायुतीत वाद पेटणार?

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये आधीच ठरलेलं होतं, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजून ही सुटलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्र्यांची घोषणा केली होती. त्यात रायगडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना दिले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार नाराज झाले होते. मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला होता. काही ठिकाणी जाळपोळ ही झाली होती. आदिती तटकरे यांना विरोध करण्यात आला होता. वाढता विरोध लक्षात घेता  रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. तेव्हा पासून आजपर्यंत पालकमंत्र्याची नियुक्ती झालेली नाही. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहे. त्यामुळे त्यांनी या पदावर दावा केला होता. असं असतानाही आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री केले गेले. पुढे मात्र त्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. त्या आधी रायगडचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे होते. त्यांनी आता रायगडचे पालकमंत्री कोण होणार हे आधीच ठरलं होतं. याबाबतचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत रायगड पालकमंत्रिपदावरून वाद होण्याची शक्यता आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb Tomb: 'औरंगजेबाची कबर काढून चालणार नाही' मोदींच्याच मंत्र्याने थेट भूमिका घेतली

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये आधीच ठरलेलं होतं, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. मी अडीच वर्षे रायगडचा पालकमंत्री होतो. भरतशेठ गोगावले तेव्हा मंत्री झाले नव्हते. म्हणून ती जबाबदारी त्यावेळी माझ्यावर होती.पण जेव्हा भरतशेठ पुन्हा निवडून येतील तेव्हा ते तिथे पालकमंत्री होतील, असं तिन्ही पक्षांमध्ये ठरलेलं होतं, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे भरत गोगावलेच पालकमंत्री व्हावेत असं आम्हा सर्वांचं म्हणणं आहे असं ही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला

दापोलीत एका कार्यक्रमात उदय सामंत बोलत होते. पालकमंत्रिपदाबाबत  तिन्ही नेत्यांनी मिळून मार्ग काढावा असं ही ते म्हणाले. मात्र उदय सामंत यांनी जाहीर पणे पहिल्यांदा रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. की ते जैसे थे स्थिती ठेवता हे ही पाहावं लागणार आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही तसाच आहे.  

Advertisement