मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या मिश्कील स्वभावाने नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा हजरजबाबी पणाची दाद तर सर्वच राजकीय पक्षातले नेते आणि कार्यकर्ते देत असतात. त्याचं अचूक टायमिंग तर भन्नाट आहे. ते कधी काय बोलतील याचा नेम नसतो. पण ते जे काही बोलतील त्यामुळे अनेकांची मात्र विकेट जाते हे मात्र नक्की. असा एक किस्सा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियीवर जोरदार व्हायरल होत आहे. दहीहंडी तोंडावर आहे. त्यामुळे मुंबईत त्याची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका लक्षात घेता सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मोठमोठ्या दहीहंड्यांचे आयोजन करत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेचे ही कार्यकर्ते त्यात मागे नाहीत. त्यांनी ही दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्याला राज ठाकरेंनी उपस्थितीत लावाली अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यातील आयोजक हे राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत.
नक्की वाचा - Nashik News: घरांना हादरे बसले, काचा फुटल्या; नाशिककरांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?
या पार्श्वभूमीवर MNS कार्यकर्ता मुनाफ ठाकूर यांनीही दहीहंडीचं आयोजन केलं आहे. एल्फिन्स्टन रोड प्रभादेवी इथं त्यांनी पक्षाच्यावतीने दहीकाला उत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंनीही त्यांची भेट घेतली. त्यावेळी दहीहंडीच्या निमंत्रणावर राज ठाकरे यांनी मिश्किल पणे आपल्या कार्यकर्त्याची फिरकी घेतली. "मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो! असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरें यांच्या या अचानक हल्लानं मुनाफ ठाकूर हा कार्यकर्ता थोडा गोंधळला.
त्याला थोडावेळ काहीच समजलं नाही. पण त्याने स्वत:ला सावरलं. त्यानंतर त्याला राज ठाकरे काय म्हणत आहेत ते समजलं. तिथं असलेले सर्व कार्यकर्त्यांमध्ये नंतर हशा पिकला. राज ठाकरेंनी त्यांच्या दहिहंडीचं नंतर आमंत्रण स्विकारलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवाय सध्या चिकन मटण विक्री बंदीवरून वातावरण ही तापलं आहे. त्यात मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्विकारतो हे वक्तव्य करून राज ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं!
दरम्यान 15 ऑगस्ट कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याला राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी थेट भूमीका घेत कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा असं ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनालाच तुम्ही लोकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी घालत आहात असंही ते म्हणाले. सरकारने कुणी काय खावं हे सांगू नये असं ही त्यांनी सांगितलं. कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार करायला हवा, स्वातंत्र्यदिनी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे, असंही राज ठाकरे म्हणालेत.