'मनसेला सत्तेत बसवणार' राज ठाकरेंचा निर्धार, किता जागा लढणार ते ही सांगितले

विधानसभेच्या किती जागा लढणार याचा आकडाही राज यांनी जाहीर करून टाकला. ऐवढेच नाही तर सत्ता स्थापनेत मनसेचा रोल काय असेल तेही स्पष्ट केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

परदेशातून परतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्याला संबोधित करताना विधानसभा निवडणुकीची मनसेची दिशा काय असेल याबाबत त्यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. शिवाय युती की आघाडीत लढणार याबाबतचा संभ्रमही त्यांनी दुर केला. विधानसभेच्या किती जागा लढणार याचा आकडाही राज यांनी जाहीर करून टाकला. ऐवढेच नाही तर सत्ता स्थापनेत मनसेचा रोल काय असेल तेही स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. रंगशारदा येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसे किती जागा लढणार? 

विधानसभा निवडणुकीत युती करणार की आघाडी करणार याचे उत्तर राज ठाकरे यांनी दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी मनसे युती करणार का? युतीत किती जागा मिळणार? या विचारात कोणी राहू नये असे स्पष्ट पणे सांगितले आहे. विधानसभेच्या सव्वा दोनशे ते अडीचशे जागा मनसे लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेत. निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्यालाच तिकीट दिले जाईल असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तिकीट मिळाले की पैसे काढायला मोकळा अशा प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देणार नाही असेही राज यांनी सांगितले.

ट्रेंडिंग बातमी - Live Update : पुण्यात 'जल'कल्लोळ, वाहनं पाण्याखाली, शाळांना सुट्टी; इतर जिल्ह्यांमध्ये काय आहे स्थिती?

मनसैनिकांना सत्तेत बसवणार  

कोणता आमदार कोणत्या पक्षात आहे हे विचारावे लागत आहे. अशी स्थिती राज्याच्या राजकारण या आधी कधीच नव्हती. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षात जे काही घमासान होणार आहे ते न भूतो असणार आहे. मात्र मनसे हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांच्यासाठी मीच लाल कार्पेट टाकतो असे राज म्हणाले. मनसेच्या कार्यकर्त्यांना काही करून सत्तेत बसवायचे आहे असा निर्धार त्यांनी केला. यावर काही जण हसतील. पण त्यांना हसू द्या. निवडणुक निकालानंतर मनसेचे कार्यकर्ते सत्तेत असतील म्हणजे असतील असे राज यांनी ठणकावून सांगितले. आम्ही सर्व जण तयारीला लागले आहोत असे राज म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - तरुणाने अटल सेतूवर गाडी थांबवली, अन् क्षणाचाही विचार न करता केले धक्कादायक कृत्य

राज ठाकरेंचा सर्वे 

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वे केला आहे. त्याचा पहिला राऊंडही झाल्याचे राज यांनी या मेळाल्यात सांगितले. आता दुसरा राऊंड होणार आहे. त्यासाठी काही लोक तुमच्या मतदार संघात येतील. त्यांना योग्य माहिती द्या असे राज यांनी सांगितले. हा सर्वे राज ठाकरे यांना जुलै महीनाखेर पर्यंत मिळेल. त्यानंतर 1 ऑगस्टपासून राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्ताय ते जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

Advertisement

लोकसभेत मोदींना पाठिंबा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. आता विधानसभेला मात्र राज यांनी भूमिका बदलली आहे. त्यांनी युतीच्या भानगडीत न पडता स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मनसे सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढेल असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विधानसभेला मनसेची वेगळी चुल असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.