दिशा सालियान प्रकरणात आपल्याला उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केला होता. असा गौप्यस्फोट खासदार नारायण राणे यांनी केला होता. शिवाय या प्रकरणात आदित्य ठाकरेचे नाव घेवू नका. सहकार्य करा अशी विनंतही ठाकरे यांनी केल्याचा दावा राणे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आधी आदित्य ठाकरे आणि नंतर संजय राऊत यांनी राणे यांना जशाच तसे उत्तर देत त्यांच्या दाव्यातील हवाच काढली आहे. संजय राऊत यांनी ही मग राणे यांना अटक झाली त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील कुणी कुणी उद्धव ठाकरेंना फोन केले होते? हेच सांगून राणेंची कोंडी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सजंय राऊत यांनी राणेंच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणेंनी कशाच्या आधारावर असं वक्तव्य केलं आहे हे जमजून घेणं गरजेचं आहे. त्यांची प्रकृती बरी नाही का? ते थोडं पाहावं लागेल. त्यांचे वय आता सत्तरी पार झाले आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीची आम्हाला काळजी वाटते. राणेंना ज्यावेळी अटक झाली होती त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना फोन केले होते. शिवाय सांभाळून घ्या. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना विकार आणि काही त्रास आहेत, असंही त्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं असंही राऊत यावेळी म्हणाले.
ऐवढेच नाही तर दिल्लीतून अमित शहा यांचाही फोन उद्धव ठाकरेंना आला होता. ते आमचे मंत्री आहेत. जरा संभाळून घ्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची सुटका करण्याची सुचना केली होती याची आठवण राऊत यांनी राणे यांना करून दिली. आता या गोष्टी काढायच्या असतात का? पण राणेंनी त्या काढायला लावल्या, असे राऊत म्हणत त्यांनी राणेंना एक प्रकार फटकारलं. शिवाय त्यांचा दावाही खोडून काढला.
त्या आधी आदित्य ठाकरे यांनी राणेंचा उल्लेख कचरा असा केला होता. माझं तेच काम आहे, मी कचऱ्यावर काही बोलत नाही. त्यांना उत्तर द्यायचं नाही, कारण यांना पगारच आमच्यावर घाण आरोप कराण्यासाठी मिळतो असं वक्तव्य करत त्यांनी राणेंनाच डिवचलं. शिवाय त्यांना कचऱ्याची उपमा दिली. त्यांना जे बालायचं आहे ते बोलू द्या. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता.