'ठाकरे 288 जागा लढले तर 160 जागा जिंकतील' राऊतांचे सुचक वक्तव्य

संजय राऊत यांनी भाषणाच्या शेवटी एक सुचक वक्तव्य करत महाविकास आघाडीचे टेन्शन मात्र वाढवले आहे. त्यांच्या या वक्तव्याने जागा वाटपावरून मविआमध्ये धुसफूस सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पुण्यात पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर टिकेचे बाण सोडले. पण भाषणाच्या शेवटी एक सुचक वक्तव्य करत महाविकास आघाडीचे टेन्शन मात्र वाढवले आहे. त्यांच्या या वक्तव्याने जागा वाटपावरून मविआमध्ये धुसफूस सुरू असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एकनाथ शिंदें बरोबरच भाजपचाही समाचार घेतला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

'शिवसेना स्वबळावर लढली तर...' 

शिवसंकल्प मेळाव्यात संजय राऊत यांनी विधानसभेचे चित्र कसे असेल? सध्याच्या स्थिती शिवसेना ठाकरे गटाची ताकद किती आहे? याचीच मांडणी केली. ते म्हणाले की सध्याच्या स्थिती जर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 288 जागा लढल्या तर किमान 160 जण निवडून येतील. मात्र आपण शब्द दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणूक लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मविआ पुढे जाईल. शिवाय आघाडीचे सर्वोच्च नेतृत्वही उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी मेहनत करण्याची गरज आहे. सर्वाधिक जागा या शिवसेनेच्या निवडून द्या असे आवाहन ही त्यांनी केले. काही करून महाराष्ट्र काबीज करायचा आहे असे ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं

 '...हम खुले आम ठोकते है' 

मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यात दिला होता. त्याच पुण्यात शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा झाला. फडणवीसांच्या ठोकून काढाला संजय राऊत यांनीही जशाच तसे उत्तर दिले. एक तर तू राहशील नाही तर मी राहीन हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तीच आपल्या विधानसभा निवडणूकीची टॅग लाईन राहाणार आहे असे राऊत म्हणाले. काही झालं तरी महाराष्ट्रात शिवसेनेचं राहाणार आहे. तुम्हारे जैसे कुत्ते भोकते है, हम शेर है, हम खुले आम ठोकते है, असा प्रत्युत्तरच त्यांनी यावेळी दिलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार? उच्च न्यायालयात याचिका, मागणी काय?

'निवडणूक सोपी नाही' 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला हवं तसं यश मिळालं नाही. अपेक्षे पेक्षा कमी जागा मिळाल्या. काही जागा या अतिशय कमी फरकाने हातू निसटल्या. त्यात मुंबई, बुलढाणा, हातणंगलेच्या जागांचा राऊत यांनी उल्लेख केला. या जागा आल्या असत्या तर शिवसेना राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असता. आता विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीला गाफिल राहू नका. लोकसभे पेक्षा जास्त घमासान या निवडणुकीत होणार आहे. नुसती हवा करून चालणार नाही. लोकसभेची निवडणूत लढलो आणि जिंकलो. आता विधानसभेची लढाई तुंबळ होणार आहे. ही आरपारची लढाई आहे. प्रत्येकाला छातीचा कोट करावा लागेल असे राऊत यावेळी म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेआधी ठाकरे- शिंदे वर्षावर भेटले, चर्चा काय झाली?

'भाजपची हिंदू मतांसाठी तयारी' 

लोकसभा निवडणुकीत भाजपला  हिंदूंची मतं मिळाली नाहीत. उलट उद्धव ठाकरे यांना हिंदू बरोबर सर्वच जाती धर्माच्या लोकांनी मतदान केले. देशातल्या अधिकृत लोकांची मत मिळाली. उद्धव ठाकरे हे एक आश्वासक चेहरा आहेत. हे त्यातून सिद्ध झाले आहे. हिंदूंची मते भाजपला मिळाली नाहीत त्यामुळे ते आता कामाला लागले आहेत. जर आता कामाला लागले आहात तर गेली पस्तीस वर्ष काय करत होता असा प्रश्न राऊत यांनी भाजपला केला आहे. यातून शिवसेना जर भाजपच्या बरोबर नसेल तर त्यांना हिंदू मतं मिळत नाहीत असा दावा राऊत यांनी यावेळी केला. 

ट्रेंडिंग बातमी - शिंदेंच्या नेत्याची काँग्रेसला मदत? आता भाजपनेत्याने दंड थोपटले, वाद पेटणार?

'किती जागा लढायच्या त्याची यादी तयार' 

विधानसभेच्या पुण्यात किती जागा लढायच्या याची यादी तयारी आहे असे संजय राऊत यांनी सांगितले. आता पर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या पालख्या वाहील्या आता तुम्ही तुमच्यासाठी कामाला लागा असा आदेशच संजय राऊत यांनी यावेळी दिला. पुणे आणि मावळ मधील प्रत्येक जागा लढण्यास शिवसेना सक्षम आहे असे त्यांनी सांगितले. लोकसभेला पुणे, बारामती आणि शिरूरसाठी शिवसैनिकांनी काम केले. कसबा पोटनिवडणुकीतही शिवसेनेने काम केले. त्या आधी भाजपचे उमेदवार निवडून आणले. त्यात शिवसेनेची भूमिका महत्वाची होती. आता मात्र शिवसैनिकांनी स्वत:साठी काम करायचे आहे असे राऊत यावेळी म्हणाले.