महाविकास आघाडीचा मुंबईत मोठा मेळावा झाला. या मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? हा विषय जास्त गाजला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे जाहीर करा, मी पाठींबा देतो असे वक्तव्य केले. पण त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांना यावर बोलणेच टाळले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र आधी निवडणूक जिंकू नंतर मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका मांडली. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे उद्धव ठाकरे कधीच बोलले नाहीत असं राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्या पुढे जे वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळे मविआमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून पुढे येण्याची गरज नाही. 2019 मध्ये ही ते मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले नव्हते. सर्वांनी मिळून त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवले होते असे संजय राऊत म्हणाले. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले. मविआच्या मेळाल्यातही त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला नव्हता. किंवा मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे म्हटले नव्हते. मुख्यमंत्रिपदासाठी जर कोणी उमेदवार असेल तर त्याचे नाव जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो असे वक्तव्य केले होते असे राऊत म्हणाले. असं असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच आहेत असेही राऊत यांनी सांगत, मुख्यमंत्रिपदावरचा आपला दावा कायम ठेवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - '...तर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 3 हजार रुपये देऊ'
संजय राऊत हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात शिवसेना ताकदीने निवडणूक लढेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रामटेकची जागा शिवसेना लढेल असेही त्यांनी स्पष्ट केले. रामटेक लोकसभा काँग्रेसला दिली. त्यामुळे जिल्हा आणि शहरात शिवसेना लढवणार आहे. लोकसभेत आघाडीचे विदर्भात यश पाहता यावेळी देखील विदर्भात आघडी चांगला स्कोअर करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टिका केली. लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. योजनेत खोडा टाकण्याचा प्रश्न येत नाही. कोणत्याही चांगल्या योजनेत, ज्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील जनतेला, महिलाना, बेरोजगारांना फायदा होईल अशा योजनाना कोणी विरोध करत नाही. शिवाय या योजना खाजगी नसतात तर त्या सरकारच्या असतात. असे ते म्हणाले. मात्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात काँग्रेसच्या अनेक योजना आपल्या नावाने खपवल्या असल्याचा आरोप राऊत यांनी केला.